तुम्ही तेल लावलेले पहेलवान तर आम्ही मातीतील कुस्तीगीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 05:30 PM2019-10-13T17:30:36+5:302019-10-13T17:46:02+5:30

शरद पवार : मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला टोला

If you are an oil wrestler then we are the wrestlers of the soil: Sharad Pawar | तुम्ही तेल लावलेले पहेलवान तर आम्ही मातीतील कुस्तीगीर

तुम्ही तेल लावलेले पहेलवान तर आम्ही मातीतील कुस्तीगीर

googlenewsNext




जळगाव : आम्ही मातीतील कुस्तगीर आहोत. आम्ही कुस्तीगिरासोबतच कुस्ती खेळतो. तुम्ही तसे पहेलवान नाही, तुमच्यासोबत काय कुस्ती खेळायची, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शेंदुर्णी, ता.जामनेर येथील सभेत रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. आम्ही तेल लावून तयार असलेले पहेलवान आहोत, असे विधान फडणवीस यांनी केले होते. यावर पावारांनी हा टोला लगावला.
राष्ट्रवादीचे जामनेर मतदारसंघातील उमेदवार संजय गरूड यांच्या प्रचारार्थ त्यांची रविवारी सभा झाली. यावेळी बोलताता ते म्हणाले की, बुडीत बँकांना वाचविण्यासाठी केंद्र शासन ७० हजार कोटी देते. मात्र आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी कोणतीही आर्थिक तरतूद का नाही? शेतकऱ्याला हमीभाव, बेरोजगारांना रोजगार या समस्यांकडे दुर्लक्ष करून कलम ३७० चा जास्त गवगवा केला जात आहे. आम्ही महाराष्ट्राला देशातील क्रमांक १ चे राज्य केले तर यांनी राज्य अधोगतीला आणले. सुरु असलेले कारखाने बंद पडल्याने कामगार देशोधडीला लागल्याचा आरोप पवार यांनी केला.

 

Web Title: If you are an oil wrestler then we are the wrestlers of the soil: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.