शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

यशप्राप्तीसाठी सकारात्मक ध्येयाचा शोध घेतल्यास निश्चितच मार्ग सापडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 16:02 IST

चाळीसगाव : रजनी पाटील यांनी दिला ‘आयएम पॉझिटिव्ह’चा संदेश

चाळीसगाव, जि.जळगाव : ‘आयएम पॉझिटिव्ह चाळीसगावकर’ ग्रुपतर्फे आयोजित चाळीसगाव महाविद्यालय व य.ना.चव्हाण महाविद्यालयात ‘चला दोस्तहो, आयुष्यावर बोलू काही’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची पालक आणि शिक्षकांप्रती असलेल्या संवादाची अनास्था व मनावरील होत असलेले अनियंत्रित संतुलन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यशप्राप्तीसाठी सकारात्मक ध्येयाचा शोध घेतल्यास निश्चितच मार्ग सापडेल, असे व्याख्यात्या प्रा.डॉ.रजनी पाटील यांनी सांगितले.या वेळी चाळीसगाव एज्युकेशन संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर, युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव, स्त्रीरोग संघटनाच्या अध्यक्षा डॉ.उज्ज्वला देवरे, स्वयंदीप फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद बिल्दीकर, प्राचार्य एस.आर. जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.क्षणभंगुर सुखामुळे आजचा विद्यार्थी जीवनाच्या खऱ्या आनंदास मुकला आहे. समाजरचना समजून घेताना स्वत:त बदल व्हायला हवा. आपल्यातील चांगले-वाईट ओळखण्याचा अधिकार आपलाच असून, स्वत:चे मित्र बनण्याचे शिकायला हवे. यासोबतच दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम, शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन, वॉरेन बफेट, भारतरत्न सचिन तेंडुलकर, संगणकाचा महाद्वेत्ता बिल गेटस अशा अनेक महान व्यक्तींचे दाखले लक्षात घेता त्यांचे यश आपणास दिसते. परंतु त्यामागील त्यांचा संघर्ष लक्षात घ्यायला हवा. ‘जिंदगी जिना आसान नही होता, बिना संघर्ष कोई महान नही होता’ यानुसार जीवनाच्या अखेरपर्यंत संघषार्चा सामना हसतमुखाने केल्यास यशदायी फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत मनाचा मोठेपणा बाळगून येणाºया संकटाचा सामना मी लिलया करेल, असा आत्मविश्वास बाळगायला हवा, असे व्याख्यात्या प्रा.डॉ.रजनी पाटील यांनी हितगुजातून विद्यार्थ्याशी संवाद साधला.‘आयएम पॉझिटिव्ह’, ‘आपण चाळीसगावकर’ ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांना स्वत:विषयक सतावणारी भीती, परीक्षेतील अपयश, मानसिक संतुलन, नैराश्य याबाबत १८००८४३४३५३ हेल्पलाईनद्वारे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. ही संपूर्ण माहिती गोपनीय स्वरुपात ठेवण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.सूत्रसंचालन चाळीसगाव महाविद्यालयाचे प्रा.रवींद्र पाटील, य.ना.चव्हाण महाविद्यालयाचे प्रा.अरुण पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा.ए.एस.महाजन, संजय पवार यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी ‘आय एम पॉझिटिव्ह’,‘आपण चाळीसगावकर या ग्रुपचे सचिन पवार, संजय पवार, दिलीप घोरपडे, अर्जुन परदेशी, शरद पाटील, समकित छाजेड, स्वप्नील कोतकर, अजय जोशी, स्वप्नील धामणे, योगेश पाटील, देवेन पाटील, राजेंद्र छाजेड, प्रकाश कुलकर्णी, रमेश पोतदार, प्रा. अनिल बागड आदी पदाधिकाºयांनी परिश्रम घेतलेत.

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव