शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

घटनेला हात लावला तर आमच्यासारखे कोणी वाईट नाही !

By सुनील पाटील | Updated: August 31, 2023 18:38 IST

रामदास आठवले यांचा इशारा : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील

जळगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेला अजून कोणी हात लावलेला नाही, आणि कोणी लावलाच तर आमच्यासारखा वाईट कोणीच नाही असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा दावाही आठवले यांनी केला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर गुरुवारी जळगावात झाले. त्यात मार्गदर्शन करताना आठवले बोलत होते.

राज्य घटना बदलाला आठवले यांनी या बैठकीत विरोध दर्शविला आहे. तसा प्रयत्न झाला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. नाशिक जेलमध्ये मी १५ दिवस राहिलो आहे. आताही जेलमध्ये जाण्याची तयारी आहे, असे आठवले म्हणाले.

एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, त्यांच्या जागी कोणीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही. महायुती अभेद्य आहे. त्यामुळे चर्चा, अफवांकडे लक्ष देऊ नका. आगामी निवडणूका लक्षात घेता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. गाव तेथे शाखा, गल्ली तेथे फलक व झेंडा असलाच पाहिजे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आता एका समाजापुरता राहिलेला नाही. सर्व समाजाचे लोक या पक्षात आहेत. सरकारच्या योजना घराघरात पोहचवा. अधिकारी काम करीत नसतील तर त्यांना ठणकावून सांगा. आदीवासींना त्यांच्या गायरान जमिनी, घरे मिळवून द्या.