शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबराव पाटलांनी माफी मागितली, तरी खटला मागे घेऊ, एकनाथ खडसे यांचा प्रस्ताव

By विलास.बारी | Updated: June 19, 2023 20:03 IST

गुलाबराव पाटलांच्या विरोधातील अब्रुनुकसानीच्या खटल्याप्रकरणी कामकाज

विलास बारीजळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपण दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात, माफी मागितली तरी आपण खटला मागे घेऊ, असा प्रस्ताव आमदार एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्याविरोधात २०१६ मध्ये केलेल्या वक्तव्याविरोधात, खडसे यांनी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी सोमवारी न्यायालयात कामकाज झाले. त्यासाठी खडसे सोमवारी न्यायालयात आले असताना, ते पत्रकारांशी बोलत होते.

याप्रकरणी खडसेंनी पुरावे म्हणून काही कागदपत्रे न्यायालयात सादर केली. तसेच या कागदपत्रांसंदर्भात न्यायालयात शपथपत्रदेखील सादर केले. या खटल्याबाबत मागील आदेश तसेच ठेवून गुलाबराव पाटील यांच्या विरोधातील अब्रुनुकसानीचा खटला पुढे सुरू ठेवावा, अशी विनंती न्यायालयात केली. दरम्यान, गुलाबराव पाटील यांचे नाव सोमवारी दोन वेळा न्यायालयाने पुकारले. मात्र, मंत्री गुलाबराव पाटील हे स्वतः किंवा त्यांचे वकील यापैकी कुणीही कोर्टात हजर झाले नाही. या खटल्याची मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण...

तत्कालीन युती सरकारमध्ये एकनाथ खडसे हे कृषिमंत्रीसह बारा खात्यांचे मंत्री असताना त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून स्वतःच्या शेतावर ४० लाखांचे पॉलिहाऊस त्याचप्रमाणे त्यांच्या मुक्ताईनगर सूतगिरणीसाठी सरकारकडून दीडशे कोटी लाटले, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला होता. या आरोपांवरून एकनाथ खडसे यांनी त्यांच्या विरोधात जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात २०१६ साली ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना, खडसे आणि गुलाबराव पाटील हे या सरकारच्या काळात एकत्र सत्तेत होते. त्यावेळेस खडसेंनी किमान एक रुपया नुकसान भरपाई द्यावी, असा प्रस्ताव दिला होता. तो गुलाबराव यांनी फेटाळून लावला होता. त्यानंतर पाच वेळा या प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी काही काळ लांबली होती.

मंगेश चव्हाणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणारयेत्या दोन दिवसांत आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती खडसेंनी दिली. मंगेश चव्हाण यांनी दूध संघातील कथित भ्रष्टाचार तसेच इतर कारणांवरून आमदार एकनाथ खडसे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. त्यामुळे जनमानसात आपली प्रतिमा मलिन झाल्याचा दावा करत खडसेंनी मंगेश चव्हाण यांच्यावर दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती दिली.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेGulabrao Patilगुलाबराव पाटील