शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

स्व.गोपीनाथ मुंडे असते तर माझ्यासारख्या निष्ठावंतांवर अन्याय झाला नसता : एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 19:59 IST

बहुजन समाजात भारतीय जनता पक्ष पोहोचविण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे यांचे कार्य फार मोठे होते. आज ते नसल्यामुळे एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ते असते तर आमच्या सारख्या निष्ठावानांवर अन्याय झाला नसता अशी भावना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्देगोपीनाथ गडावर रवाना होण्यापूर्वी साधला संवादस्व.गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलच्या आठवणींना दिला उजाळास्व.गोपीनाथ मुंडे लोकनेते असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना केले मोठे

मुक्ताईनगर, जि.जळगाव : बहुजन समाजात भारतीय जनता पक्ष पोहोचविण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे यांचे कार्य फार मोठे होते. आज ते नसल्यामुळे एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ते असते तर आमच्या सारख्या निष्ठावानांवर अन्याय झाला नसता अशी भावना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.माजी मंत्री एकनाथराव खडसे हे माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या निमंत्रणानुसार बुधवारी बीड येथील गोपीनाथ गडाकडे रवाना झाले. आपण दरवर्षी गोपीनाथ गडावर जात असून गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेला जिव्हाळा त्यांच्या निधनानंतरदेखील कायम असल्याचे सांगत मुंडे गेल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतरदेखील त्यांचे महत्त्व कमी झाले नाही. त्यांच्या कार्याबाबत नेहमी चर्चा समाजात व राजकारणात केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.तर युती कायम राहिली असतीस्व.मुंडे हे जिवंत असते तर महाराष्ट्रात शिवसेना व भाजपची युती कायम राहिली असती व भाजपची स्थिती कितीतरी पटीने चांगली राहिली असती. भाजप व शिवसेना यांच्यात समन्वयकाची भुमिका नेहमी त्यांनी घेतली होती. भाजप व शिवसेनेसोबतच त्यांचे अन्य पक्षातही चांगले संबध होते. त्यामुळे त्यांनी टाकलेला शब्द देखील विरोधक अडवित नसत. एखादी चुक झाल्यानंतर उदार मनाने ती मान्य करण्याचा मोठा गुण त्यांच्याकडे होता. एखादी चूक पक्षाच्या ठिकाणी झाल्यास ते खुल्या मनाने मान्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सेना-भाजप जे काही वाद असायचे ते तात्काळ सोडवण्याचे काम गोपीनाथ मुंडे हे करत असत. लोकनेते असल्याने त्यांनी नेहमी कार्यकर्त्यांना मोठे केल. दरवर्षी आपण गोपीनाथ गडाकडे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :JalgaonजळगावMuktainagarमुक्ताईनगर