शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

सावधान, बेशिस्त पार्कींग केली तर येईल घरपोच मेमो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:56 IST

ई-चलन : अडीच महिन्यात २ हजार ८३१ जणांना पाठविली दंडाची पावती जळगाव : रस्त्यावर कुठेही बेशिस्तपणे वाहन पार्कींग केले ...

ई-चलन : अडीच महिन्यात २ हजार ८३१ जणांना पाठविली दंडाची पावतीजळगाव : रस्त्यावर कुठेही बेशिस्तपणे वाहन पार्कींग केले तर यापुढे वाहतूक पोलीस बोलायला येणार नाही.आता अशा वाहनांचा मोबाईलमध्ये फोटो घेऊन तुमच्या घरीच दंडाची पावती धडकणार आहे. याची प्रत्यक्ष सुरुवात शहर वाहतूक शाखेने केली असून अडीच महिन्यात २ हजार ८३१ जणांना घरपोच मेमो पाठविण्यात आला आहे. त्यापैकी १ हजार २४१ जणांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयात जाऊन दंड भरला आहे. ही रक्कम ३ लाख १९ हजार ६०० रुपये इतकी वसूल झाली आहे. अजून १ हजार ५९० जणांकडून दंडाची रक्कम वसूल होणार आहे. तत्कालिन पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या संकल्पनेतून विकसीत झालेली ई-चलन प्रणाली ३ जानेवारी पासून कार्यान्वित झाली. ई-चलन प्रणालीसाठी खास अशा यंत्रणेसह एक मोठे मॉनेटर, प्रिंटर संगणक प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. मोठ्या मॉनेटरवर चौक व तेथील नियम तोडणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र स्पष्टपणे दिसते. यासाठी सहा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पोलीसच घेताहेत फोटोकारवाईच्यावेळी पोलिसांशी वाद होतात. त्यामुळे आता शहरात बेशिस्त पार्कींग व वाहतूक कोंडी होत असेल तर पोलीस नियमभंग करणाºया वाहनाचे फोटो घेऊन ते ई-चलनसाठी वाहतूक शाखेच्या कार्यालयात पाठविले जाते. तेथून मेमो तयार होऊन तो वाहनधारकाच्या पत्यावर जातो. शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांकडून फोटो काढायला सुरु झाली आहे. विशेष म्हणजे साामान्य नागरिकही अशा वाहनांचे फोटो काढून वाहतूक शाखेकडे पाठवू शकतात.५६ कॅमेऱ्यांची नजरशहरात पोलीस दलाच्यावतीने ५६ सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहेत. त्यांद्वारे नियम मोडणाºया वाहनाचे चित्र वाहतूक शाखेतील नियंत्रण कक्षात दिसेल. तेथील आॅपरेटर त्या गाडीच्या चित्रावर क्लिक करताच त्या वाहनाचे स्नॅप शॉर्ट घेतले जातात. त्यानंतर वाहनाचे सॉफ्टवेअर असलेल्या एका संगणकावर त्या वाहनाचा क्रमांक टाकला जातो. या क्रमांकावरुन वाहनाबाबची इत्यंभूत माहिती येते. गुन्ह्याचा प्रकार टाकल्यानंतर त्यासाठी असलेले दंडाचे शुल्क, घटनास्थळ, तारीख, वेळ व फोटो असलेली प्रतच बाहेर येते. ही प्रत (मेमो) वाहनधारकाच्या मुळ पत्त्यावर पाठविले जात आहे. मेमोवर वाहनधारकाने नेमकी काय चुक केली याचे छायाचित्रही राहत असल्याने चूक नाकारताच येत नाही.गर्दी, अपघात, वाहतूक कोंडीवरही नियंत्रणया प्रणालीचा नुसते वाहतूक नियमाचे उल्लंघन इतकाच उपयोग होत नाही, तर रस्त्यावर कुठे अपघात झाला, कुणाची चूक आहे, रॅश ड्रायव्हींग, वाहतूक कोंडी कुठे झालेली आहे यावरही नियंत्रण ठेवले जात आहे. त्याशिवाय मोकळ्या रस्त्यावर मोबाईलवर बोलणे, तीन सीट याचेही चित्रिकरण होत आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक घटना या सीसीटीव्हीत कैद होत आहे. आकाशवाणी, जिल्हाधिकारी कार्यालय, स्वातंत्र चौक, जिल्हा रुग्णालय, कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा थांबा, नेहरु पुतळा, सरस्वती डेअरी, टॉवर चौक, भीलपुरा, असोदा रोड, रथ चौक, सुभाष चौक, बेंडाळे चौक आदी ठिकाणी हे ५६ कॅमेरे आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव