शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

बाबा मंत्री राहिले असते तर विकासकामे दुप्पट झाली असती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:38 IST

‘लोकमत’ भेटीत खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केली भावना

ठळक मुद्दे प्रशासकीय प्रक्रियेमुळे महामार्ग चौपदरीकरणास विलंब झाल्याची खंतसमवयस्क खासदारांसोबत सुसंवादभुसावळ-पुणे रेल्वे सुरू होणार

जळगाव : बाबा मंत्री राहिले असते तर जिल्ह्यात दुप्पट विकासकामे झाली असती, अशी भावना खासदार रक्षा खडसे यांनी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्यासंदर्भात ‘लोकमत’ भेटीप्रसंगी व्यक्त केली. जिल्ह्यात आतापर्यंत जी विकासकामे केली ती त्यांच्या दोन वर्षांच्या मंत्रीपदाच्या काळातीलच असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.‘लोकमत’ कार्यालयाला त्यांनी सोमवारी सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी त्यांचे स्वागत केले. चार वर्षात मतदार संघातील अनेक विकासकामे मार्गी लावली. तसेच रखडलेली अनेक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.अनुभवाचा फायदा झालाचार वर्षातील कारकीर्द कशी राहिली? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, सत्ताधारी पक्षात असल्याने जास्त कामे करण्याची संधी मिळाली. त्यामुळे चार वर्षे कसे गेले कळलेच नाही. लोकसभा मतदारसंघ खूप मोठा असतो. मात्र ग्रा.पं. व जि.प. सदस्य म्हणून काम केलेले असल्याने त्या अनुभवाचा निश्चित फायदा झाला. खासदारांना जेमतेम ५ कोटींचा निधी मिळतो. त्यातून संपूर्ण मतदार संघात कामे करणे शक्य नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमध्ये गावांची कामे बसवून ती मार्गी लावली.दत्तक गावांचा विकास कितपत झाला? याबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या की हातेड हे गाव मी दत्तक घेतले. त्या संकल्पनेत लोकांचाही विकास कामात सहभाग तेवढाच अपेक्षित होता. मात्र लोकांना वाटले आता कोट्यवधींनी निधी येणार. तरीही आम्ही ४ कोटींची कामे केली. आता मलकापूर तालुक्यातील धरणगाव दत्तक घेतले आहे. तेथे विकासकामे सुरू आहेत.समवयस्क खासदारांसोबत सुसंवादतुमच्या समवस्क खासदारांशी कसे ट्युनींग आहे? याबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, खासदार हिना गावीत, प्रीतम मुंडे, श्रीकांत शिंदे, हरियानातील चौटाला आदी आम्ही समवयस्क खासदार नेहमीच आपआपल्या मतदारसंघात काय नवीन काम केले? याबाबत चर्चा करीत असतो. दुसऱ्याने केलेले चांगले काम आपल्या मतदार संघातही करण्याचा प्रयत्न करतो.खासदारकीची पहिलीच टर्म असल्याने दिल्लीतील कामकाजाच्या अनुभवाबाबत त्या म्हणाल्या की दिल्लीत काम करायला मिळाली म्हणून स्वत:ला नशिबवान मानते. या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न आहे.भुसावळ-पुणे रेल्वे सुरू होणारखासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, केंद्रशासनाच्या अखत्यारितील रेल्वे तसेच रस्त्यांच्या कामाला गती आली आहे. ४ रेल्वे उड्डाणपुलांचे काम प्रलंबित होते. त्यासाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. भुसावळ रेल्वे स्टेशनची अनेक कामे सुरू आहेत. सचखंड एक्सप्रेसला रावेर येथे थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न आहे. तसेच तिसºया व चौथ्या रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर भुसावळ-पुणे रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले आहे. महामार्गांचीही अनेक कामे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे मार्गी लागली.‘मेगा रिचार्ज’मुळे पाणीप्रश्न मिटणार... मेगा रिचार्ज प्रकल्पाचे सर्वेक्षण झाले असून ‘डीपीआर’ करण्यात आला आहे. त्याचे नितीन गडकरी यांच्याकडे होईल. त्यानंतर अंदाजपत्रक तयार होऊन त्याची अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. ही योजना पुढील ५० वर्षे निम्म्या जिल्ह्यासाठी लाभदायी ठरेल.जळगाव-मुंबई विमानसेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नजळगाव-पुणे विमानसेवेसाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी झुम एअरलाईन्सला प्रस्ताव दिला आहे. उडान योजनेंतर्गत आधीच्या विमान कंपन्यांशी झालेले करार संपत आले असून आता नव्याने निविदा प्रक्रिया केली जाणार असल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले. जळगाव-मुंबई विमानसेवा सुरळीत करण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. लवकरच यश मिळेल, असा आशावादही व्यक्त केला.