शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाचोऱ्यात साकारली साडेपाच फूट उंचीची बुद्ध मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 15:25 IST

भीमनगर येथील शिल्पकार भिवसने या दोन्ही बंधुनी १५ दिवसांमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची साडेपाच फुटांची मूर्ती साकारली. मूर्ती पाचोरा शहरातील समाज बांधवासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

ठळक मुद्देभिवसने बंधूच्या कलेचे सर्वत्र कौतुक, ध्यान मूद्रेतील मूर्ती सर्वांचेच ठरले आकर्षणभगवान बुद्ध मूर्तीचेच केले भिवसने बंधुंनी धम्मदान

आत्माराम गायकवाडखडकदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव : भीमनगर येथील शिल्पकार भिवसने या दोन्ही बंधुनी १५ दिवसांमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची साडेपाच फुटांची मूर्ती साकारली. मूर्ती पाचोरा शहरातील समाज बांधवासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. पाचोरा एम. एम. कॉलेजचे माजी वरिष्ठ लिपीक यशवंत देवचंद भिवसने व त्यांचे लहान बंधू राजेंद्र देवचंद भिवसने या शिल्पकारानी मूर्ती साकार करण्याची संकल्पना मांडली. एप्रिलमध्ये कामास सुरुवात केली. १५ दिवसात साडे पाच फुटांची सिमेंटची ध्यान मुद्रा अवस्थेतील बुद्ध शिल्प भिवसने बंधुनी साकारले हे विशेष. त्यांनी मूर्ती धम्मदान म्हणून दिली आहे. चित्रकलेची आवड असलेल्या भिवसने बंधुनी आपल्या शिल्पकलेला तथागतच्या मूर्तीपासून सुरुवात केली. त्यांना चित्रकलेची आवड लहान पणापासूनच आहे. बुद्धांचा शांतीचा संदेश व त्यांचे अनुकरण समाजात रुजेल, यासाठी पाचोरा येथे बैठक घेवून बुद्ध विहाराच्या आवारात मूर्ती बनवण्याचा संकल्प केला होता. ध्यान मुद्रा अवस्थेतील मूर्ती परिसरातील सर्वांचे आकर्षण आहे. मूर्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.आत्मविश्वासातू साकारले शिल्पपाचोरा येथील भिमनगरातील भिवसने बंधुनी साडे पाच फूट उंचीची बुद्धमूर्ती साकारुन आदर्श निर्माण केला. त्यानी मूर्तीकलेचे कुठलेही शिक्षण व प्रशिक्षण घेतलेले नसतांना जिद्द, आत्मविश्वासाने बुद्धाचे ध्यान मुद्रेतील आगळीवेगळे शिल्प साकारले. या शिल्पकलेचे पाचोरा शहरातून कौतुक होत आहे. मूर्तीबनविण्यासाठी त्यांनी आर्थिक मोबदला घेतला नाही. धम्म दान रुपाने मूर्ती लुंबिनी बुध्द विहार समिती भिमनगर यांना साकारुन दिली आहे.अशी साकारली बुद्ध मूर्तीपाचोरा शहरातील भिमनगर येथील लुंबिनी बुध्द विहारात तथागत भगवान गौतम बुध्दांची मूर्ती अवघ्या पंधरा दिवसात साकारली आहे. ध्यान मुद्रेतील बुध्द मूर्ती साकारण्यासाठी सिमेंट, लोखंड, खडी व विटां चे तुकडे, रंगकाम आदी साहित्याचा वापर मूर्तीकार भिवसने बंधुंनी केला आहे. ध्यान मुद्रा अवस्थेत असणारी ही भगवान बुद्धांची मूर्ती तब्बल साडे पाच फूट उंचीची आहे. बहुदा जिल्ह्यातील अशी पहिलीच आणि इतक्या उंचीची ही भगवान तथागत गौतम बुद्धांची पहिलीच मूर्ती असावी,असे मानले जात आहे.या शिल्पामुळे पाचोरा शहराच्या सौंदर्यात भर पडल्ी आहे.पाचोरा शहरातील भिमनगर येथील रहिवासी आणि एम. एम.कॉलेजचे माजी वरिष्ठ लिपीक यशवंत देवचंद भिवसने व त्यांचे लहान बंधू राजेंद्र देवचंद भिवसने या शिल्पकारांनी भगवान गौतम बुद्ध यांची ध्यान मूद्रेतील मूर्ती साकारली. त्यासाठी त्यांनी कोणताही आर्थिक मोबदला घेतला नाही. भीमनगर बुद्ध विहार समितीकडे ही मूर्ती एक धम्मदानाच्या रुपात सोपविण्यात आली. त्यांचे कौतुक होत आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमPachoraपाचोरा