शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

रात्री तीन वाजता जाग आली अन‌् उघड झाली चोरीची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:15 IST

वॉचमनच्या घरात चोरट्यांचा डल्ला; नऊ हजारांचा ऐवज लंपास लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील सहारा हॉटेलजवळील ...

वॉचमनच्या घरात चोरट्यांचा डल्ला; नऊ हजारांचा ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील सहारा हॉटेलजवळील पत्र्याच्या खोलीत राहणाऱ्या वॉचमनच्या घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत नऊ हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी (दि. १७) मध्यरात्री तीन वाजता जाग आल्यावर घरात पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

सुरेश सोनू राठोड हे कालिका माता मंदिराजवळील सहारा हॉटेलशेजारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारातील पत्राच्या शेडमध्ये राहतात. त्या इमारतीच्या ठिकाणी वॉचमन म्हणून ते कामाला आहेत. १७ मार्च रोजी रात्री जेवण झाल्यानंतर सुरेश राठोड हे पत्नीसह बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत झोपण्यासाठी गेले; तर मुले घरात झोपलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरात शिरून दोन मोबाईल, टीव्ही आणि मिक्सर असा एकूण नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. मध्यरात्री सुरेश राठोड यांना जाग आल्यानंतर ते पाणी पिण्यासाठी घराकडे गेले. त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात जाऊन पहिल्यानंतर त्यांना टीव्ही दोन मोबाईल व मिक्सर चोरीला गेल्याचे दिसून आले. अखेर गुरुवारी (दि. १८) त्यांच्या पत्नी छाया राठोड यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास साहाय्यक फौजदार किरण पाठक करीत आहेत.