शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तिच्याशिवाय मी जगूच शकत नाही...म्हणत कापल्या हाताच्या नसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : विवाहित महिलेच्या प्रेमात वेडापिसा झालेल्या एका तरुणाने स्वतःच्या हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : विवाहित महिलेच्या प्रेमात वेडापिसा झालेल्या एका तरुणाने स्वतःच्या हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी घडली. दीपक संजय पाटील (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. तो एनगाव, ता. बोदवड, जि.जळगाव येथील रहिवासी आहे.

बेलतरोडीतील दोन मुलांची आई असलेल्या ३५ वर्षांच्या एका महिलेसोबत त्याची फेसबुकवर ओळख झाली. नंतर टॅक्सी ड्रायव्हर असलेला पाटील गेल्या वर्षी नागपुरात आला. त्याने महिलेशी संपर्क साधून तिचा पत्ता जाणून घेतला आणि तिच्या घरी पोहोचला. तेथे त्याने जाणे-येणे वाढविल्याने या दोघांचे सूत जुळले. बरेच दिवस त्यांचे प्रेमसंबंध गुपचूप सुरू होते. ३० जुलै २०२० रोजी त्याने या महिलेला जळगावला पळवून नेले. महिलेच्या नवऱ्याने बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मोबाइलवरून माग काढून जळगाव गाठले. तेथे त्यांनी महिलेला विचारपूस केली असता मी स्वमर्जीने पाटीलसोबत आली आणि आता मला परत यायचे नाही. पाटील सोबतच राहायचे आहे, असे तिने सांगितले. त्यामुळे पोलीस परत आले. दरम्यान, तब्बल सात महिने हे दोघे जळगावला पती-पत्नीसारखे राहत होते. नंतर त्यांच्यात खटके उडाल्याने तीन आठवड्यांपूर्वी ही महिला नागपुरात आपल्या घरी परतली. मोठ्या मनाच्या नवऱ्यानेही तिला स्वीकारले. सर्व सुरळीत असताना आता तीन दिवसांपूर्वी पाटील पुन्हा नागपुरात परतला. त्याने महिलेचे घर गाठले. तेथेच दोन दिवस मुक्काम ठोकला आणि तिला सोमवारी दुपारी आपल्या सोबत जळगावला घेऊन जाण्यासाठी जबरदस्ती करू लागला. महिलेने नकार दिला. त्यामुळे त्याने तिच्याशी वाद घालून तिच्या घरातील भाजी कापण्याच्या चाकूने आपल्या दोन्ही हाताच्या नसा कापून घेतल्या. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केली. तर तिच्या पतीने बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार विजय आकोत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून जखमी पाटीलवर उपचार करून घेतले. त्यानंतर महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून त्याने आरोपी पाटील विरुद्ध आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

---

... हिच्या वाचून करमेना !

पोलिसांनी आरोपी पाटीलला विचारणा केली असता त्याने ‘हिच्यावाचून मी जगू शकत नाही. मला करमतच नाही,’ असे सांगितले. पोलिसांनी त्याची कशीबशी समजूत घालून त्याला जळगावला पाठवून दिले.

---