शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: July 15, 2014 12:25 IST

हापूर येथील विवाहितेची तिच्या पतीने निर्घृण हत्या करून स्वत: विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. १३ रोजीच्या मध्यरात्री ही थरारक घटना घडली.

 जामनेर : तालुक्यातील शहापूर येथील विवाहितेची तिच्या पतीने निर्घृण हत्या करून स्वत: विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. १३ रोजीच्या मध्यरात्री ही थरारक घटना घडली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील गारखेडा येथील माहेर असलेल्या सरला (वय १८) हिचा तीन महिन्यांपूर्वीच शहापूर येथील दीपक काशिनाथ जाधव यांच्याशी विवाह झाला होता. सरलाची मोठी बहीणही दीपकच्या मोठय़ा भावाला दिली होती. एकाच घरात दोघी बहिणी सुखी राहतील अशी आशा तिच्या माहेरील लोकांना होती. घर छोटे असल्याने दीपक व सरला त्यांच्या जुन्या घरी रात्री झोपायला जात. हे घर थोड्या लांब अंतरावर होते. सरला नेहमीच सकाळी ५ वाजता उठून यायची. आज १४ रोजी ती ६ वाजेपर्यंत न आल्याने मोठी बहीण तिला उठविण्यासाठी गेली असता सरलाला तिच्या पतीने कायमचे झोपविले असल्याचा प्रकार उघडकीस आला. रागीट स्वभावाचा असलेला दीपक नेहमीच इतरांशी गुर्मीतच बोलायचा. यामुळे तो काहीसा एकटा एकटाही राहायचा. दीपकने मध्यरात्री पलंगावर झोपलेल्या सरलाला मोबाइल चार्जरच्या वायरीने फाशी दिली. यापुढे जाऊन त्याने व्यायामाच्या लोखंडी डंबेल्सने तिच्या डोक्याच्या मागील बाजूस, कपाळावर, गालावर, ओठावर, हनुवटीवर वार करून जीवे मारले. पत्नीच्या हत्येनंतर त्यानेही विषारी पदार्थ सेवन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. गावकर्‍यांना कळताच त्यांनी दोघांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सरला मृत झाली होती, तर दीपकला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.घटनेची माहिती मिळताच सरलाचे आई-वडील, भाऊ, नातलग शहापूरला दाखल झाले व एकच आक्रोश सुरू झाला. आमदार गिरीश महाजन यांनी घटनास्थळी येऊन कुटुंबाचे सांत्वन केले. गावातील पहिलीच घटनाशहापूर येथील काशिनाथ चांगो जाधव यांच्या कुटुंबाचा शेतीवरच उदरनिर्वाह चालतो. मेहनती कुटुंब म्हणून गावात या कुटुंबाचा परिचय आहे. पत्नीच्या हत्येची ही पहिलीच घटना गावात घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ज्या लोखंडी डंबेल्सने दीपकने सरलाच्या शरीरावर वार केले तसेच मोबाइल चार्जरच्या वायरीने गळफास दिला ते साहित्य पोलिसांनी घटना स्थळावरून जप्त केले आहे. डीवायएसपी रमेश गावीत यांनी घटना स्थळी येऊन पाहणी केली. पीआय रफीक शेख, विठ्ठल काकडे, संजय तायडे तपास करीत आहेत. सरलाची हत्या व स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या दीपक विरुद्ध धोंडू तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हत्येची मालिकातालुक्यात ३0 जून रोजी पळासखेडे मिराचे येथे पत्नीने पतीची १ जुलै रोजी जामनेर येथे, तर पतीने पत्नीची २ रोजी सुनसगाव येथे पतीने पत्नीची आणि ही अशा चार हत्येच्या घटना तालुक्यात १५ दिवसात झाल्या आहेत. (वार्ताहर)