शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक व शारीरिक छळातून पतीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:37 IST

पत्नी कोमलने दिला जबाब

नेरी, ता. जामनेर : पतीकडून वारंवार होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून पतीचा खून करण्याचे अमानुष कृत्य आपल्या हातून घडल्याची माहिती पतीच्या खुनात आरोपी असलेल्या कोमल पवार हिने जामनेर पोलिसांना दिली. कोमल पवार हिला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तिची जळगाव येथे उपकारागृहात रवानगी करण्यात आली आहे.३ मार्च रोजी संदीप पवार यांचा पत्नी कोमल हिने अतिशय अमानुषपणे खून केला होता. त्यानंतर घडलेल्या घडामोडीनंतर बुधवार, १३ मार्च रोजी तिला जिल्हा रुग्णालयातून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर जामनेर न्यायालयात उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याने पोलिसानी तिची कसून चौकशी केली असता गेल्या अनेक दिवसांपासून पती संदीप हे आपणास नेहमी मारहाण करून मानसिक त्रास देत होते. त्यांची तिसरे लग्न करण्याची इच्छादेखील त्यांनी बोलून दाखवली होती त्यामुळे राग अनावर होऊन सदरची घटना घडल्याचे कोमलने सांगितल.कोमल सोबत संदीपचे हे दुसरे लग्न होते. याआधी जामनेर तालुक्यातील वाकोद या गावातील मुलीशी २०१७मध्ये त्याचे लग्न झाले होते. मात्र काही दिवसातच पहिल्या पत्नीला फारकती दिली होती. त्यानंतर मे २०१८मध्ये तालुक्यातीलच मोहाडी येथील कोमलशी संदीपचा विवाह झाला होता.कोमल सात महिन्यांची गरोदर असताना लग्नाला एक वर्षदेखील पूर्ण होत नाही तो पर्यंत पतीची तिसऱ्या लग्नाची इच्छा पाहून कोमल मनातल्या मनात खचत गेली आणि आपल्या होणाºया बाळाच्या काळजी पोटी अस्वस्थ होऊ लागली होती, अशी माहिती मिळाली. याप्रकरणी अजून काही नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.घटनेच्या दिवशी पुन्हा याच विषयावरून दोघांमध्ये वाद झाला आणि कोमलने आपल्या पतीला धडा शिकवण्याचे ठरवले. खुनाच्या आदल्या रात्री वाद झाल्याने आपण आपल्या खोलीतून निघून गच्चीत झोपलेल्या सासू सासऱ्यांकडे गेले असता ते झोपलेले होते. याठिकाणी आपण काही वेळ सासूचे पाय दाबत असताना गच्चीत चूल मांडलेला दगड (पेव्हर ब्लॉक) पडलेला दिसला. थोड्या वेळाने तो पेव्हर ब्लॉक सोबत आपल्या खोलीत आणला व पती झोपल्याचे पाहून संतापात हल्ला केला अशी हकीकत कोमलने सांगितली.

टॅग्स :Jalgaonजळगाव