रावेर - अलीकडच्या काळात पती, पत्नी आणि वो यासारख्या बातम्या बऱ्याच ऐकायला येत आहेत. त्यातच पत्नी आणि प्रियकराने मिळून पतीचा खून केल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. यातच जळगावच्या रावेर येथील एक घटना समोर आली आहे. प्रियकराच्या ओढीने संसाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या पत्नीचं पतीने प्रियकरासोबत लग्न लावलं आहे. परंतु सासरच्यांनी जावयावरच संताप व्यक्त केला.
पतीच्या अनुपस्थितीत पत्नीच्या प्रियकराचा वावर घरात वाढला. संसाराकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यामुळे पतीने पत्नीला तिच्या प्रियकराकडे सुपूर्द केले. रावेरच्या बऱ्हाणपूर महामार्गावर ही घटना घडली आहे. मात्र या नंतर सासरच्या मंडळींनी जावयावरच संशय व्यक्त केला. त्याच्याविरोधात पोलीस ठाणे गाठले. अखेर विवाहितेने प्रियकरासोबत लग्न केल्याचे फोटो पोलिसांनीच सासरच्या मंडळींना दाखवले आणि वाद मिटवला.
पत्नीच्या प्रियकरासोबत वाढत्या जवळीकीमुळे पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाला होता. प्रियकराच्या भेटीच्या ओढीत पत्नीने पतीकडे आणि संसाराकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. त्यामुळे मानसिक त्रास सहन करणारा पती पत्नीला सोबत घेऊन मोटारसायकलने जात असताना रस्त्यावरून समोरून तिचा प्रियकर आला. त्यानंतर पत्नीच्या संमतीने पतीने तिला प्रियकराच्या दुचाकीवर बसवून त्याच्या हवाली केले. त्यानंतर पत्नीच्या आई वडिलांनी जावयावरच आरोप केले.
पत्नीला प्रियकरासोबत जाऊ दिल्याबद्दल तिच्या आई वडिलांनी संशय व्यक्त केला. नाराज सासरच्या मंडळींनी जावयाविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले. या घटनेचा तपास केला तेव्हा विवाहितीने प्रियकरासोबत लग्न लावल्याचे फोटो प्रसारित झाले. यावरून सासरच्यांनी जावयावर आरोप केले होते. तर पोलिसांनी दोन्ही पक्षांचे समुपदेशन करून हा वाद संपुष्टात आणला.