शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव तालुक्यात कुसुंबा येथे तुफान हाणामारी; ४ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 12:08 IST

हॉटेलची तोडफोड

जळगाव : माफीचा साक्षीदार होऊ नये आणि मुलाला शिवीगाळ का करतो, या कारणावरुन कुसुंबा येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात तलवारींसह लोखंडी रॉड आणि दगडाचा वापर करण्यात आल्यामुळे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास बसस्थानकावर जवळ घडली़ याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात १८ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तसेच एका हॉटेलाची सुध्दा तोडफोड करण्यात आली आहे़कुसंब्यातील रवींद्र शांताराम बाविस्कर यांचा गावातील बस स्टॉपजवळ दुध विक्री व हॉटेल व्यवसाय आहे़ सोमवारी सकाळी ते वडील शांताराम व भाऊ प्रवीण असे हॉटेलवर आले होते़ त्यावेळी श्रावण शेनफडू कोळी व हिंमत नामदेव पाटील हे दोघे त्याठिकाणी आले़ तुझा भाऊ प्रवीण हा माझा मुलास शिवीगाळ करतो असे म्हणत श्रावण याने रवींद्र याच्याशी वाद घातला़ त्याचवेळी पंडीत कोळी, योगश कोळी, गोलू कोळी, गणेश कोळी, भावलाल पाटील, चंद्रकांत पाटील, मयुर पाटील, चेतन पाटील, नीलेश पाटील, जगन्नाथ कोळी, राजू कोळी (सर्व रा़ कुसुंबा) हे सुध्दा त्याठिकाणी आले व त्यांनी अचानक रवींद्र यांच्यासह त्यांचे वडील व भावास मारहाण करण्यास सुरूवात केली़ लोखंडी रॉड व लाठा-काठ्यांनी वापर झाला. त्यात रवींद्र हा जखमी झाला़ तसेच जमावाने हॉटेलवर दगडफे करून तोडफोड केली़ नंतर गल्ल्यातील ७ हजार रूपये जबरीने काढून घेतले़ याबाबत एमआयडीसी पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल आहे़माफीचा साक्षीदार का झाला? म्हणत केले तलवारीने वारदुसऱ्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेतकरी श्रावण शेनफडू कोळी हा वास्तव्यास आहे़ सोमवारी सकाळी ते बस स्टॉपजवळ विकास दूध वाटपासाठी आले होते़ त्यावेळी त्याठिकाणी प्रवीण शांताराम कोळी, रवींद्र कोळी, विशाल कोळी, विजू (पूर्ण नाव माहित नाही), शांताराम कोळी हे पाचही जण तेथे आले़ त्यांनी तु माफीचा साक्षीदार का झाला? असे म्हणत श्रावण यांना मारहाण करण्यास सुरूवात केली़ त्यानंतर प्रवीण याने श्रावण याच्या मानेवर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला़ मात्र, त्याने तो वार चुकवला आणि तलवार कानावर लागली. रवींद्र याने श्रावण याच्या हाताच्या बोटावर कोयत्याने वार केले़ तर शांताराम याने लोखंडी रॉडने श्रावण यास मारहाण केली़ श्रावण कोळी व रवींद्र बाविस्कर (कोळी) यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.मंत्री गुलाबराव पाटील व निरीक्षक यांच्यात वादकुसुंब्याच्या हाणामारी प्रकरणासंदर्भात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरिक्षक रणजित शिरसाठ यांच्याशी संपर्क साधला. त्यात वाद झाल्यामुळे रात्री ११ वाजेच्या सुमारास शिवसेना कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमले होते़ तासाभराच्या चर्चेनंतर शिवसैनिक पोलीस ठाण्यातून बाहेर पडले़

टॅग्स :Jalgaonजळगाव