शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

रावेर तालुक्यात चक्रीवादळाने कोट्यवधीचे नुकसान

By admin | Updated: June 1, 2014 00:24 IST

रावेर तालुक्यातील रसलपूर, केºहाळे, मंगरूळ, पिंप्री व मोहगण शिवारात शुक्रवारी वादळी पावसाने ऐन कापणीवरील नवती केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याने कोट्यवधीची हानी झाली आहे.

 यावल/रावेर : यावल तालुक्यात गुरुवारी झालेल्या चक्रीवादळाने कोट्यवधीचे नुकसान झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी रावेर तालुक्यालाही फटका बसला आहे़ रावेर तालुक्यातील रावेरसह रसलपूर, केºहाळे, मंगरूळ, पिंप्री व मोहगण शिवारात शुक्रवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास वादळी पावसाने ऐन कापणीवरील नवती केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याने कोट्यवधीची हानी झाली आहे. यावल : केळी आडवी तालुक्यातील कोरपावली, महेलखेडी, विरावली, मोहराळे, दहीगाव, सौखेडा, चुंचाळे, साकळी, सातोद, कोळवद, डोंगरकठोरा, चितोडा, नावरे या गावपरिसरात गुरुवारी चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसल्याने कोट्यवधी रुपयांचे केळी पीक उद्ध्वस्त झाले आहे़ शुक्रवारी दुपारी पालकमंत्री संजय सावकारे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत महसूल व कृषी विभागास तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले़ गुरुवारी दुपारी यावल तालुक्यात चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला़ विरावली, कोरपावली, मोहराळे, दहीगाव या परिसरात सर्वात जास्त नुकसान झाले असून केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. विशेष म्हणजे ऐन कापणीच्या उंबरठ्यावर असलेल्या नवती केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. पालकमंत्री सावकारे यांनी गुरुवारी कोरपावली येथील महेमूद अन्वर पटेल, मोहराळे येथील सुरेश जिजाबराव पाटील, दहीगावचे राजेंद्र यशवंत पाटील, विरावलीचे डिगंबर विठ्ठल पाटील, अर्जुन माणिक पाटील यांच्या शेताची प्रातिनिधीक पाहणी केली़ उत्पादकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळेल या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सावकारे म्हणाले़ तहसीलदार विजयकुमार ढगे, कृषी अधिकारी सी.जे. पाडवी, चोपड्याचे पं.स. सभापती डी.पी. साळुंके, प्रा. मुकेश येवले उपस्थित होते. ४भालोदला इलेक्ट्रिक खांब आडवे सांगवी बु.।। ते चितोडादरम्यान २९ रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे केळीच्या बागांचे मोठे नुकसान तर झालेच, शिवाय इलेक्ट्रिक खांब आडवे पडून वीजतारा तुटल्याने शेतीचा वीजपुरवठा बंद झाला़ २९ रोजी दुपारी ३.३० ते ४.३० वाजेदरम्यान चक्रीवादळामुळे भालोदसह परिसरात केळी खोेडे उन्मळून केळी उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ४साकळीत कोट्यवधीचे नुकसान केळी भावात सारखी घसरण सुरू असतानाच २९ रोजी चक्रीवादळामुळे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे़ ३० रोजी सकाळपासून नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून यात सुमारे एक कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज आहे. कृषी सहायक एम.एन. खंबायत, तलाठी पी.बी. राजपूत यांनी केळी नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून तीन ते चार दिवसांपर्यंत हे पंचनामे सुरू राहणार आहेत. साकळी येथील शेतकरी व यावल कृउबास संचालक विलास पाटील यांच्या २५० ते ३०० क्विंटल तयार असलेल्या केळीचा भाव घसरणीमुळे कापणीला खोळंबा झाला. त्यांच्या केळी बागेमधील हजारो केळी झाडे उद्ध्वस्त होऊन मोठे नुकसान झाले. याशिवाय साकळी येथील शिवारात मनोहर भोळे, अनिल जोशी, सुधाकर चित्रे, वाय.जी.नेवे, कु मुदनी नेवे, राजू मराठे, गणेश नेहेते, वसंत बडगुजर, दिलीप वाणी, देवीदास पाटील, भगवान पाटील इत्यादी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेताची पाहणी करून पंचनामे करण्यात आले आले़ ४दहीगाव : ४०० हेक्टरवर नुकसान दहीगाव परिसरात चक्रीवादळामुळे ४०० हेक्टर क्षेत्रातील केळी बागांचे नुकसान झाले आहे़ ३० मे रोजी तलाठी कृषी सहायक व सहकार्‍यांनी पंचनाम्यांना सुरुवात केली़ १०० हेक्टर क्षेत्रातील केळी बागांचे पंचनामे करण्यात आलेले असून दोन दिवसात पंचनामे आटोपतील, असे तहसीलदार विजयकुमार ढगे म्हणाले़ परिसरात सर्वात जास्त कोरपावली शिवारात केळीचे २०० हेक्टर क्षेत्रापर्यंत नुकसान झाले आहे. तर मोहराळा, सावखेडासीम येथील जि.प. शाळेवरील पत्रे उडाली आहेत. मृत गुरांचे पंचनामे करण्यात आलेले आहेत. दहीगावात ९५० घरांवरील उडालेल्या पत्र्यांचे व नुकसानीचे पंचनामे सायंकाळपर्यंत करण्यात आले आहेत. त्यांचे अंदाजे पावणेदोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे तलाठी के.आर. पाटील यांनी सांगितले. शुक्रवारी पालकमंत्री संजय सावकारे, अरुणभाई गुजराथी, माजी खासदार हरिभाऊ जावळे, सुशीलाबेन शहा, जि.प.चे माजी सदस्य वसंत महाजन, चोपडा पं़स़चे सभापती डी.पी. साळुंके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, अनिल साठे यांनी भेट देऊन पाहणी केली़ ४रावेर : भरपाई द्याल तर पंचनामे करा ५० टक्क्यांच्या आत झालेल्या नुकसानीची भरपाई शासन निकषात नाही. परिणामी प्रती खोड ७५ रुपयेप्रमाणे शासन नुकसान भरपाई देण्यास तयार असेल तरच प्रशासनाला पंचनामे करू देऊ अन्यथा पंचनामेच करू देणार नाहीत, असा इशारा केºहाळा शिवारातील संतप्त शेतकर्‍यांनी शुक्रवारी दिला आहे. ताशी ६० ते ६५ कि.मी.पेक्षा जास्त वेगवान वादळी वार्‍याने रावेर, रसलपूर, केºहाळे, पिंप्री, मंगरूळ व मोहगण शिवारात पावसासह २० ते २५ मिनिटे थैमान घातल्याने नवती बागांमधून ऐन कापणीवर आलेल्या केळीचे खोड भुईसपाट झाले आहेत़ रसलपूर, केºहाळे व मंगरूळ हे केळीचे शिवार या वादळी पावसाचे केंद्रबिंदू ठरले आहे़ तहसीलदार कुंदर हिरे व तालुका कृषी अधिकारी विजय भारंबे यांनी खानापूर भाग मंडळाधिकारी आर.के. पवार यांना नुकसानग्रस्त भागाच्या