शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शेकडोंचा आधारवड हरविला, रतनलाल बाफना यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 16:10 IST

सुवर्णनगरी पोरकी : संध्याकाळी पाच वाजता अहिंसा तीर्थ येथे अंत्यसंस्कार जळगाव : शाकाहार सदाचारचे प्रणेता, स्वर्णनगरी जळगावचे नाव देशभर ...

सुवर्णनगरी पोरकी : संध्याकाळी पाच वाजता अहिंसा तीर्थ येथे अंत्यसंस्कार

जळगाव : शाकाहार सदाचारचे प्रणेता, स्वर्णनगरी जळगावचे नाव देशभर पोहचविणारे, सुवर्ण व्यावसायिक आर.सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक रतनलाल सी. बाफना (८६) यांचे सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी संध्याकाळी पाच वाजता अहिंसा तीर्थ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.बाफना यांच्या निधनामुळे जळगावातील व्यापार, उद्योग, सामाजिक क्षेत्रात दुःखाचे वातावरण पसरले असून शेकडोंचा आधारवड हरविल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थमुळे बाफना यांच्यावर उपचार सुरू होते. 

जळगावात एक छोटेसे दुकान टाकून सुवर्ण व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणारे बाफना यांनी विश्वास, सचोटी, पारदर्शकता या बळावर जळगावातील सोने देशभर पोहचविले. एका छोट्या दुकानापासून मोठ्या शोरूमपर्यंतचा प्रवास करणारे बाफना यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून शेकडोंना रोजगार उपलब्ध करून दिला. हळूहळू हा व्यवसाय औरंगाबाद, नाशिक अशा वेगवेगळ्या शहरात बाफना ज्वेलरच्या शाखा सुरू केल्या. या सोबतच जळगावनजीक गोशाळा सुरू करून मुक्या गुरांना आधार दिला. 

शैक्षणिक मदतबाफना यांनी व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक संकटात असलेल्यांना आधार दिला. तसेच अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करीत त्यांना आधार दिला. 

बाफना यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. या परिवारासोबतच सुवर्ण पेढ्यांमधील कर्मचार्यांचाही आधार हरविल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. 

जैन समाजासाठीही मोठे योगदानव्यवसाय, गोरक्षा अशा कार्यासह बाफना यांनी जैन धर्मियांच्या साधू संत, मुनी यांच्यासाठी निवासस्थान, धर्मशाळा सुरू केल्या.

टॅग्स :Jalgaonजळगाव