शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

हास्य कवितांची बहारदार मेजवाणी : पावसाळी वातावरणात बरसणार ‘हास्य धारा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 11:53 IST

व.वा. वाचनालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन

जळगाव : व.वा. वाचनालयाच्या १४२व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हास्य धारा’ या कार्यक्रमाचे ३० जूूून रोजी सायंकाळी ६.३० वाजता कांताई सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. या बहारदार कार्यक्रमाद्वारे रसिकांना एकाहून एक सरस हास्य कविता ऐकण्याची संधी उपलब्ध होणार असून पावसाळी वातावरणात एक प्रकारे नामवंत कवींच्या हास्य धाराच या वेळी बरसणार आहेत.शतकोत्तर व.वा. वाचनालयाचा वर्धापन दिन दरवर्षी वेगवेगळ््या कार्यक्रमांची मेजवाणी घेऊन येतो. त्यानुसार यंदाचा वर्धापन दिन पावसाळी वातावरणात पाऊस धारांसह ‘हास्य धारा’ घेऊन आला आहे. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे आपल्या विडंबन काव्याने मराठी रसिकांना भूरळ घालणारे रामदास फुटाणे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. ‘भारत कधी कधी माझा देश आहे....’ अशा काव्य पंक्तींनी आकर्षित करणारे, विविध हास्य कविता संग्रहासह चित्रपट कथालेखक, दिग्दर्शक अशा चतु:रस्त्र व्यक्तीमत्त्वाला अनुभवण्याची संधी ‘हास्य धारा’ने जळगावकर रसिकांना उपलब्ध करून दिली आहे.या सोबतच दीर्घ काव्य संग्रहकार तसेच नाट्यलेखक, कवी अनिल दीक्षित (पुणे), ललित लेखक, कवी साहेबराव ठाणगे (अहमदनगर), ज्यांच्या कविता दूरचित्रवाणीवरून राज्यभरात पोहचलेल्या असे कवी भरत दौडकर (शिक्रापूर), चित्रपट गीतकार, गझलकार, कवी नितीन देशमुख (चांदूरबाजार) आणि कवी नारायण पुरी (तुळजापूर) हे कविता सादर करणार आहेत.अशा नामवंत कवींच्या कविता ऐकण्याचा हा कार्यक्रम विनामूल्य असून वाचनालयाचे सभासद वाचक, साहित्यप्रेमी रसिकांनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयाने केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव