शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील वनव्यामुळे वनसंपदेचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 18:01 IST

आग लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

ठळक मुद्देघटनास्थळी सहाय्यक वनसंरक्षक एस.एस.दहिवले यांनीही भेट दिलीआगीमुळे लाखो रूपयांची वनसंपत्ती नष्टआग लावणाºयांविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतबिडगाव, ता.चोपडा, दि.११ : सातपुड्यातील कुंड्यापाणी मोहरद हद्दीत दोन दिवसापूर्वी भडकलेल्या वनव्यामुळे वनसंपदेचे प्रचंड नुकसान झाले. ग्रामस्थ व वन कर्मचाºयांनी तब्बल बारा तास परिश्रम घेतल्यानंतर ही आग आटोक्यात आली होती. यात लाखो रूपयांची वन संपती जळून खाक झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आग लावणाºयांविरूद्ध कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.सातपुड्यातील देवझीरी परिक्षेत्रातील वरगव्हान परिमंडळात येणाºया मोहरद शिवारातील कक्ष क्र.१५९ मध्ये ९ रोजी रात्री वनवा पेटला होता. हा वनवा इतका भयंकर होता की, तब्बल १५ ते १६ कि. मी. अंतरावरून तो धगधगतांना दिसत होता. देवझीरीचे आर.एफ.ओ.जैतकर वरगव्हान मंडळाचे वनपाल एस.डी.देवरे व तब्बल ३० कर्मचारी कर्जाना परिक्षेत्राचे १० कर्मचारी मोबाईल स्कॉड पथकाचे पाच कर्मचारी व बढाई बढवानी येथील ग्रामस्थ यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले.तीन दिवसांपूर्वीच मनुदेवी जंगलात आग लागुन मोठे नुकसान झाल्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा लागलेल्या या आगीने लाखो रूपयांची वनसंपत्ती नष्ट झाल्याने वनवा पुढे वनअधिकारी हतबल ठरतांना दिसत आहेत. वनवा पेटवणाºयांवर कठोर कारवाई केली जावी अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडा