शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वाघ वाचणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 12:29 IST

- मिलिंद कुलकर्णीमुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा येथील पूर्णा नदीपात्रात आढळून आलेल्या वाघाच्या मृतदेहाविषयी कारणाचा उलगडा झाला आहे. उसाच्या शेतात मुक्कामी असलेल्या वाघाला तारेच्या कुंपणात वीज प्रवाह सोडून ठार मारण्यात आले. वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नायलॉनच्या दोरीने बांधून बैलांकरवी हा मृतदेह फरफटत नदीपात्राजवळ नेण्यात आला. तेथे तो पाण्यात ढकलून देण्यात आला. पाणी ...

- मिलिंद कुलकर्णीमुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा येथील पूर्णा नदीपात्रात आढळून आलेल्या वाघाच्या मृतदेहाविषयी कारणाचा उलगडा झाला आहे. उसाच्या शेतात मुक्कामी असलेल्या वाघाला तारेच्या कुंपणात वीज प्रवाह सोडून ठार मारण्यात आले. वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नायलॉनच्या दोरीने बांधून बैलांकरवी हा मृतदेह फरफटत नदीपात्राजवळ नेण्यात आला. तेथे तो पाण्यात ढकलून देण्यात आला. पाणी पिण्यासाठी आलेला वाघ बुडून मेल्याची बतावणी करण्याचा स्थानिक शेतकऱ्यांचा प्रयत्न फसला आहे. उसाच्या शेतात वाघाचे केस आढळले असून शेतापासून नदीपात्रापर्यंत फरफटल्याच्या खुणा दिसून आल्या आहेत. वनविभागाने चौघा शेतकºयांना अटक केली आहे. पुढील कारवाई कायद्यानुसार होईल, पण वाघाच्या हत्येनंतर मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनक्षेत्रातील वाघांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोन महिन्यापूर्वीच एका वाघीणीचा मृत्यू झाला. ती वृध्द असल्याचे वनविभागाचे म्हणणे होते. त्यापूर्वीही सातत्याने वाघाचे मृत्यू, अपघाती मृत्यू घडत आहेत. दुर्देवाने स्थानिक रहिवासी, लोकप्रतिनिधी, वनविभाग आणि वन्यजीवप्रेमी व्यक्ती आणि संस्था घटना घडल्यावर चर्चा करतात, मात्र नंतर पाठपुरावा होत नाही, हे वास्तव आहे. व्याघ्र संचार मार्ग, अधिवास क्षेत्र, सौर कुंपण, डोलारखेडा येथील शेतकºयांचे पुनर्वसन असे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. व्याघ्र संरक्षण रॅली काढली जाते. व्याघ्र परिषदा होतात. पण त्यात बाहेरगावाहून येणारे वक्ते भाषणे देतात; स्थानिक टाळ्या वाजवतात आणि सोहळा संपतो. पुन्हा पुढील वर्षी ‘ये रे माझ्या मागल्या’ असे होते. रोही, रानडुक्कर यांचा मोठा उपद्रव शेतकºयांना होतो. अन्नसाखळी असल्याने या प्राण्यांचा पाठलाग वाघ करतो आणि गारव्यामुळे केळी वा उसाच्या शेतात मुक्काम ठोकतो. तशा अर्थाने वाघ माणसाळलादेखील आहे. पण रोही, रानडुक्करांना मारण्याची परवानगी वनविभागाने दिली असली तरी ती प्रक्रिया सोपी नाही. वाघ गायब झाल्यावर विदर्भात रान पेटते. गहजब होतो. याठिकाणी तर लागोपाठ दोन वाघांचे मृत्यू झाले तरी प्रशासन गाढ झोपेत आहे. कागदे रंगवित आहे. शतकोटी वृक्ष लागवडीचा संकल्प चांगला असला तरी वन्यप्राणी नसतील, तर जंगल काय कामाचे?

टॅग्स :TigerवाघJalgaonजळगाव