शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण ठेवायला नाही ‘बेड असिस्टंट’ संकल्पना कशी राबवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 18:28 IST

कोविड रुग्णालयात रुग्णांची काळजी घेण्यासाठी ‘बेड असिस्टंट’ ही संकल्पना राबवली जात आहे.

ठळक मुद्दे कोरोना : वयोवृद्ध रुग्णांसाठी नातेवाईकास कोविड कक्षात प्रवेशपूर्वपरवानगीची गरज

मतीन शेखमुक्ताईनगर : कोविड रुग्णालयात रुग्णांची काळजी घेण्यासाठी ‘बेड असिस्टंट’ ही संकल्पना राबवली जात आहे. येथील कोविड रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात रुग्ण ठेवण्यासही जागा नसल्याने सध्या रुग्णांना ‘बेड असिस्टंट’ ठेऊ दिले जात नाही. वयोवृद्ध रुग्णांसाठी व अपवादात्मक स्थितीत नातेवाईकास पूर्वपरवानगीने कोविड कक्षात प्रवेश दिला जात आहे.अनेक कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत कर्मचारी व वार्ड बॉय यांचा व्यवहार सकारात्मक नसल्याच्या तक्रारी रुग्णांकडून होत होत्या. मधल्या काळात रुग्णांना वेळोवेळी देण्यात येणाऱ्या गोळ्या कक्षात नेमणूक असलेल्या कर्मचार्यांनी फेकून दिल्याने जिल्हा स्तरावरील रुग्णालयात वादंग झाला होता. कर्मचाऱ्यांमध्येही कोविडची भीती व त्यातून अनाहूतपणे रुग्णालयात रुग्णांसोबत घडणारे प्रकार पाहता आरोग्य विभागाने कोरोना बाधित रुग्णांकरिता रुग्णांची काळजी घेण्यासाठी ‘बेड असिस्टंट’ ही संकल्पना राबविण्यास सुरवात केली आहे.रुग्णांनाच जागा अपूर्णदरम्यान, मुक्ताईनगर येथील कोविड डेडिकेटेड कक्षात क्षमतेपेक्षा जास्त असे ३५ रुग्ण उपचार घेत आहेत. अशात या ठिकाणी रुग्णांची काळजी घेण्यासाठी ‘बेड असिस्टंट’ ही संकल्पना राबविण्यास वाव नाही. मूळात रुग्णांना जागा नाही. अशात रुग्णांची काळजी घेण्यासाठी ‘बेड असिस्टंट’ला कक्षात जागा कशी देणार, हा प्रश्न उभा राहिला आहे.पूर्वपरवानगीची गरजकोविड डेडिकेटेड कक्षात रुग्णांकरिता जेवण-चहा पाण्याची व्यवस्था केली जात आहे. अशात काही रुग्णांना घरचे जेवण घ्यायचे असल्यास पूर्वपरवानगीने रुग्णाच्या एका नातेवाईकांस कोविड कक्षात सोडले जात आहे, तर वयोवृद्ध रुग्णांच्या गरजेनुसार फक्त एका नातेवाईकाला तातडीच्या गरजेवेळी कक्षाच्या आत जाण्यास मुभा दिली जात आहे. सध्या चार ते पाच रुग्णांचे नातेवाईक डबा देण्यास येतात.नातेवाईकांनाही भीतीकोरोना संकट काळात घरातील एखादे सदस्य पॉझिटिव्ह निघाले तर संपूर्ण घर क्वारंटाईन होत आहे. घरातील एखाद दुसरी व्यक्ती यातून बाहेर असली तरच कोविड कक्षात उपचार घेणाºया रुग्णांपर्यंत जाऊ शकतो. नसेल तर जवळच्या नातेवाईकांनाही भीती असते. त्यामुळे बहुसंख्य नातेवाईक दूर राहणे पसंत करतात तर अपवादात्मक परिस्थितीत रुग्णाच्या घरातील सदस्य काळजी घेतात. तुलनात्मकदृष्ट्या अशी संख्या फारच कमी आहे.डेडिकेटेड कोविड केअर सेंटर व शहरातील अन्य कोविड सेंटरवर रुग्ण ठेवण्यास जागा अपूर्ण पडत आहे. अशात रुग्णांची काळजी घेण्यासाठी बेड असिस्टंट ठेवण्यास वाव नाही. आरोग्य विभागाचे कर्मचारी अहोरात्र रूग्णांना सेवा देत आहे.-डॉ.नीलेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, मुक्ताईनगर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर