शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

शत्रुत्वाच्या जखमा भरुन कशा निघणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 12:22 IST

विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना हे काँग्रेस आघाडीपेक्षा परस्परांविरुध्द १४ ठिकाणी लढले, धुळे-नंदुरबारमधील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अंतर्गत वादाचे पडसाद उमटणार

मिलिंद कुलकर्णीमहाराष्टÑातील विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना हे युती करुन लढले, परंतु ही युती मनापासून होती की नाईलाज म्हणून केली गेली असा प्रश्न उपस्थित व्हावा, असे दोन्ही पक्षांमधील वातावरण व वर्तन होते. मुंबईतील पंतप्रधानांच्या उपस्थितीतील शेवटची सभा सोडली तर युतीचे नेते एकत्रितपणे प्रचार करताना दिसले नाही. एकमेकांच्या मतदारसंघात घुसखोरी आणि बंडखोरी केल्याने दोन्ही पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण झाली. काहीचे वाद तर पोलीस स्टेशनपर्यंत गेले. आघाडीशी लढण्याऐवजी एकमेकांशी लढल्याने शक्तीपात झाला तो वेगळाच.भाजप-शिवसेनेचे संबंध २०१४ पेक्षाही अधिक ताणले गेले आहेत. मुंबईत हे पक्ष एकत्र आले तरीही गावपातळीवर या दोन्ही पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये वितुष्ट कायम राहील. शिवसेना कधी नव्हे ते आक्रमक झाली आहे. त्याला कारणदेखील तसेच आहे. खान्देशातील २० जागांपैकी सेनेने ६ तर भाजपने १४ जागा लढविल्या होत्या. या जागावाटपाविषयी कोणतीही खळखळ, नाराजी उघडपणे व्यक्त झाली नाही, याचा अर्थ परस्पर सामंजस्याने हे जागावाटप झाले. परंतु, सेनेच्या सर्व ६ जागांवर भाजपकडून बंडखोरी झाली. त्याचा फटका नंदुरबार-धुळे जिल्ह्यात बसला. सेनेला खाते उघडता आले नाही. पण भाजपचे संख्याबळदेखील वाढले नाही. जैसे थे राहिले. उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी शिंदखेडा मतदारसंघात केलेली बंडखोरी भाजप व जयकुमार रावल यांच्या जिव्हारी लागली. ते निवडून आले, पण प्रयत्न करावे लागलेच.जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगरात जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांची बंडखोरी राज्यभर खळबळ उडवून देणारी ठरली. अर्थात जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देऊन त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि राष्टÑवादी काँग्रेसने त्यांना समर्थन दिले.अतीशय चुरशीच्या लढतीत पाटील यांनी बाजी मारली. मात्र सेनेच्या चार अधिकृत उमेदवारांना भाजप बंडखोरांनी भंडावून सोडले . पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील यांना अमोल शिंदे यांनी अखेरपर्यंत झुंजवले. जळगाव ग्रामीणमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द शेवटच्या टप्प्यात बंडखोर गटाने आरोपांची राळ उठवली. चोपडा आणि एरंडोलमध्ये वेगळे चित्र नव्हते. परंतु, चौघे उमेदवार हे अनुभवी आणि निवडणूक तंत्र अवगत असल्याने तोडीस तोड ठरले. सेनेचा स्ट्राईक रेट १०० टक्के राहिला आणि मुक्ताईनगर हा बोनस ठरला. याउलट भाजपच्या जागा दोनने घटल्या आणि रोहिणी खडसे, हरिभाऊ जावळे, शिरीष चौधरी यांच्या पराभवामुळे भाजपच्या अंतर्गत असलेली बेदिली, मतभेद, संशयकल्लोळ ठळकपणे समोर आला.काँग्रेस आणि राष्टÑवादीला एकेक जागा मिळाली, तीही भाजपच्या अंतर्गत मतभेदाचा फायदा मिळाल्यामुळे हे तर उघड आहे. चाळीसगावात राजीव देशमुख-मंगेश चव्हाण, जामनेरात गिरीश महाजन-संजय गरुड, जळगावात सुरेश भोळे-अभिषेक पाटील, धुळे ग्रामीणमध्ये कुणाल पाटील-ज्ञानज्योती भदाणे, नंदुरबारमध्ये डॉ.विजयकुमार गावीत-उदेसिंग पाडवी, शहाद्यात पद्माकर वळवी-राजेश पाडवी अशा ६ ठिकाणी फक्त युती आणि आघाडी असा सामना रंगला. उर्वरित १४ मतदारसंघात युती अंतर्गत किंवा भाजप अंतर्गत लढाई झाली. त्याचे परिणाम आता दीर्घकाळ राहणार आहेत, हे उघड आहे.नंदुरबार-धुळे जिल्ह्यात सेनेला यंदाही खाते उघडता आले नाही. अक्कलकुव्याची जागा थोडक्यात गेली. धुळे आणि अक्कलकुवा या दोन्ही ठिकाणी भाजप कार्यकर्त्याकडून बंडखोरी झाली. शिवसेनेने शिंदखेड्यात जयकुमार रावल यांच्याविरोधात बंडखोरी केली. याचे पडसाद आगामी जि.प. व पं.स.निवडणुकीत उमटल्याशिवाय राहणार नाही. अमरीशभाई पटेल, शिवाजीराव दहिेते, चंद्रकांत रघुवंशी यांच्या पक्षांतरामुळे भाजप-सेना प्रबळपणे एकमेकांविरुध्द लढतील.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव