शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात पाऊस नसताना ६१ टक्के नजर पैसेवारी कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 17:49 IST

भुसावळ तालुक्यात चार महिन्यात २४ दिवस तोही अल्पसा पाऊस झाला. शासकीय यंत्रणेच्या आधारे ४९ टक्के पाऊस पडला असल्याची नोंद आहे.

ठळक मुद्देआमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्त्वाखाली दिले निवेदनतालुक्यातील सरपंच व पदाधिकाऱ्यांसह तहसीलदारांना निवेदनभुसावळकर घेणार जिल्हाधिकाºयांची भेट

भुसावळ : तालुक्यात चार महिन्यात २४ दिवस तोही अल्पसा पाऊस झाला. शासकीय यंत्रणेच्या आधारे ४९ टक्के पाऊस पडला असल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात ३५ टक्केसुद्धा पाऊस पडला नसताना ६१ टक्के नजर पैसेवारी लागली कशी, असा प्रश्न उपस्थित करून आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले. आजच जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांना ही परिस्थिती सांगणार असल्याची माहिती त्यांनी दिली.‘लोकमत’ने दुष्काळासंदर्भात मुद्देसूद बातमी सोमवारी प्रसिद्ध केलीे होती. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. निवेदन देतेवेळी जि.प. सदस्या पल्लवी सावकारे, पं.स. सभापती प्रीती पाटील, माजी सभापती सुनील महाजन, उपसभापती वंदना उन्हाळे, जि.प. माजी सदस्य समाधान पवार, साकेगावचे सरपंच संजय पाटील, अनिल पाटील, खडक्याचे भैया महाजन उपस्थित होते. पाऊस नसल्याने मोंढाळा, महादेव तांडा, खंडाळा, शिंदी, कन्हाळा आदी गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट आहे. गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे.भविष्यात चाराटंचाईचे संकट उभे राहणार आहे. तरीही महसूल विभागाकडून ६१ टक्के पैसेवारी लावण्याचा जावईशोध कसा करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित झाला. कुºहे (पानाचे) येथील सरपंच रामलाल बडगुजर, खडका सरपंच पद्माबाई प्रतापसिंग पाटील, वांजोळा येथील सरपंच नरेंद्र पाटील, कन्हाळे येथील सरपंच राजेंद्र पाटील, खंडाळा येथील सरपंच वैशाली पाटील, मोंढाळा येथील सरपंच जगन्नाथ कोळी, कुºहे (पानाचे) येथील उपसरपंच वासुदेव वराडे, सदस्य नाना पवार, नारायण कोळी, वेल्हाळा सरपंच विजय पाटील, किन्ही सरपंच हर्षा येवले, सुनसगावचे दीपक सावकारे, भालचंद्र पाटील, जोगलखेड्याचे सरपंच पंकज पाटील, कठोरा सरपंच प्रशांत पाटील, साकेगावचे माणिक पाटील, हातनूर सरपंच नीता इंगळे, शिंदी येथील देवसिंह राजपूत, पिंपळगाव बुद्रूकचे निवृत्ती पाटील, बेलव्हाय सरपंच मनीषा खाचणे, पिंपळगाव बुद्रूकचे बाबूराव सरोदे, मन्यारखेडा येथील शशिकांत पाटील, वझरखेडा येथील किरण पाटील, खडका येथील अनिल महाजन, साकरी येथील किरण चोपडे, वांजोळा उपसरपंच देवीदास सावळे उपस्थित होते.

टॅग्स :RainपाऊसBhusawalभुसावळ