शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात वकीलाच्या बंद घरात चोरट्यांचा तासभर धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 22:23 IST

सुरक्षा रक्षक असताना वकीलाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तासभर घरात धिंगाणा घालून २८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना मंगळवारी पहाटे अडीच ते साडे तीन वाजेदरम्यान घडली. चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला बांधून ठेवल्याची चर्चा होती, मात्र पोलिसांनी या गोष्टीचा इन्कार केला आहे.

ठळक मुद्दे सुरक्षा रक्षकाला बांधून ठेवल्याची चर्चाकटरने कापले दरवाजाचे कुलुप२८ हजाराचा ऐवज लांबविला

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२१ : सुरक्षा रक्षक असताना वकीलाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तासभर घरात धिंगाणा घालून २८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना मंगळवारी पहाटे अडीच ते साडे तीन वाजेदरम्यान घडली. चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला बांधून ठेवल्याची चर्चा होती, मात्र पोलिसांनी या गोष्टीचा इन्कार केला आहे.औरंगाबाद खंडपीठात वकील असलेले सिध्दार्थ भालचंद्र यावलकर (वय ४२) हे गांधी नगरात आई, वडील यांच्यासह राहतात. २० नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता आई, वडील हे इंदूर येथे गेले होते. जातांना त्यांनी घरातील सर्व दरवाजांना कुलूप लावले होते. अ‍ॅड. यावलकर हे औरंगाबादला होते. आधार पाटील हे सुरक्षा रक्षक रात्रपाळीला होते. अ‍ॅड. यावलकर यांना मंगळवारी सकाळी पोलिसांनीच घरात चोरी झाल्याची माहिती दिली.

सर्व कपाटांचे कुलूप तोडलेचोरट्यांनी लोखंडी चॅनेल गेट, मुख्य दरवाजा व किचनचे कुलूप तोडलेले होते. कटरच्या सहाय्याने हे कडी कोयंडे तोडण्यात आलेले आहेत. हॉलमधील कपाटाचे लॉकर तोडून किचनमध्ये चोरट्यांनी नासधूस केलेली आहे. पिठाचा डबा देखील उघडून पाहिला आहे. अनेक लॉक जमिनीवरच पडून होते. लॉकरमध्ये असलेले सोने व चांदीचे बॉक्स रिकामे होते. तसेच पर्सही रिकामी होती. त्यातील १५ हजार रुपये रोख, १० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या, ३ हजार रुपये किमतीचे चांदीचे ५ नाणे असा २८ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. अ‍ॅड. गुलाबसिंग पाटील, संजय राणे, दिलीप मंडोरे,शंकर जावळे व शेजारी राहणारे प्रकाश शिरसाळे यांनीघराची पाहणी केली.सुरक्षा रक्षकाचे गोलमाल उत्तरसुरक्षा रक्षक आधार पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार एका कारमधून चार,पाच चोरटे आले व त्यातील दोन जणांनी माझे हातपाय बांधून एकाने तोंडात बोळा कोंबला व त्यानंतर चोरी करुन हे चोरटे निघून गेले. जाताना त्यांनीच मला सोडले असे त्याने सांगितले. दरम्यान, सुरक्षा रक्षकाच्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी चौकशी करुन सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र त्यात तथ्य आढळून आले नाही. सुरक्षा रक्षक झोपलेले असताना चोरट्यांनी कटरच्या सहायाने कुलूप तोडल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी दिली. सांगळे, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळ व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.