शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
4
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
5
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
6
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
7
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
8
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
9
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
10
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
11
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
12
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
13
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
14
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
15
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
16
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
17
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
18
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
19
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
20
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 

‘सिव्हील’मधून परिचारिका रफूचक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:55 IST

तरुणही बेपत्ता : तिसऱ्या दिवशी पोलिसात नोंद

जळगाव : शासकीय गणवेश परिधान करुन ड्युटीला निघालेली २२ वर्षीय परिचारिका (विद्यार्थिनी) शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातून रफूचक्कर झाल्याची घटना उघडकीस आली असून तीन दिवसानंतर सोमवारी याप्रकरणी पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, याच परिसरातून आणखी १८ वर्षीय तरुणीही बेपत्ता झाली असून तिचीही नोंद पोलिसात झाली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी परिचारिका प्रशिक्षण केंद्रात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. गेल्या वर्षी ती नापास झाली होती. दरम्यान, यापूर्वीही तिने दोन वेळा असा प्रयत्न केला होता, तेव्हा पालकांना बोलावून हा प्रकार कळविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता एक तरुणही बेपत्ता झाला आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.रफूचक्कर झालेली परिचारिका यावल तालुक्यातील रहिवाशी असून ती रुग्णालयाच्या वसतीगृहात वास्तव्याला होती. शनिवारी तिची आपत्कालिन कक्षात सकाळची ड्युटी होती. त्यानुसार ही परिचारिका शासकीय गणवेशावर वसतीगृहातून ८ वाजता ड्युटीला जायला निघाली, मात्र ती ड्युटीवर पोहचलीच नाही. विभागातून विचारणा व्हायला लागल्यानंतर अन्य सहकाऱ्यांनी चौकशी केली, मात्र काहीच माहिती मिळाली नाही. तिच्या आईकडे चौकशी केली असता तेथेही पोहचलेली नव्हती. त्यामुळे घाबरलेल्या आई व भावान दुपारी रुग्णालय व वसतीगृह गाठले. दोन दिवस सुटी असल्याने वसतीगृहात चौकशी करुनही माहिती मिळाली नाही. त्यामुळे सोमवारी हरविल्याची नोंद करण्यात आली.दोन मुलींची सारखीच नोंदरुग्णालयाच्या बाहेरुन १८ वर्षीय तरुणी त्याच दिवशी व त्याच वेळी गायब झालेली आहे. ही तरुणी शहरातीलच रहिवाशी असून त्याचीही सोमवारी दुपारी पोलिसात हरविल्याची नोंद झाली आहे.दोघांच्या नोंदीत फक्त २० मिनिटाचा फरक आहे. या तरुणीची तक्रार आईने तर दुसºया तरुणीची तक्रार भावाने दिली आहे. दरम्यान, वसतीगृहातून परिचारिका रफूचक्कर झाल्याने एकच खळबळ उडाली असून येथील सुरक्षेचे वाभाडे निघाले आहेत. दरम्यान, ड्युटीवर तसेच वसतीगृहात मोबाईल बंदी असताना येथे मोबाईलचा सर्रास वापर होत असल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :Jalgaonजळगाव