शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

फळबाग लागवडीत गैरव्यवहार!

By admin | Updated: November 10, 2015 23:26 IST

धुळे : फळबाग लागवडीचे शिरपूर तालुक्यात 16 लाभार्थीना अनुदान वाटप करण्यात आले असून प्रत्यक्षात मात्र शेतात डाळिंबाचे एकही झाड लावलेले नाही़

धुळे : रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीचे शिरपूर तालुक्यात 16 लाभार्थीना अनुदान वाटप करण्यात आले असून प्रत्यक्षात मात्र शेतात डाळिंबाचे एकही झाड लावलेले नाही़ तर काही 22 लाभार्थीकडे मंजूर रोपसंख्येपेक्षा कमी झाडे लावलेली असल्याचे तपासणीत समोर आल़े त्यामुळे यात लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आह़े त्यामुळे संबंधित कृषी विभागाच्या अधिका:यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असा प्रस्ताव कृषी विभागाच्या आयुक्तांना पाठविला आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली़

रोजगार हमी योजनेंतर्गत सन 2013-14 व 2015-16 मध्ये जिल्ह्यात लाभार्थीच्या क्षेत्रात फळबाग लागवड करण्यात आली़ लाभार्थीना अनुदानदेखील वाटप करण्यात आल़े त्यात शिरपूर तालुक्यात अनुदान वाटप करण्यात आले की नाही, तसेच झाडे लावण्यात आली आहेत का? याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी शिरपूरचे तहसीलदार नितीन पाटील यांना दिले.त्यानुसार त्यांनी लाभार्थीच्या शेतावर जाऊन पाहणी केली़ त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली़ 16 लाभाथीर्ंना अनुदान वाटप करण्यात आले आह़े मात्र प्रत्यक्षात त्यांच्या क्षेत्रात एकही डाळिंबाचे झाड लावलेले दिसून आले नाही़ तर 22 लाभार्थीच्या क्षेत्रात मंजूर रोप संख्येपेक्षा कमी रोपे लावलेली आढळून आली. त्यामुळे या फळबाग लागवडीत लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आह़े

मागविले खुलासे

हा प्रकार समोर आल्यानंतर शिरपूर तालुक्याचे संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक यांना नोटीस देऊन खुलासे मागविण्यात आले होत़े मात्र खुलासे समाधानकारक नव्हत़े

शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव

गैरव्यवहार समोर आल्याने जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी शिरपूर तालुक्याचे संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, असा प्रस्ताव कृषी विभागाच्या आयुक्तांना पाठविला आह़े

कृषी अधिका:यांचे दुर्लक्ष

लाभार्थीना डाळिंब झाडाचे अनुदान वाटप झाल्यानंतर लाभार्थीच्या क्षेत्रात झाडे लावलेली आहेत का? किती लावली आहेत? याची कृषी विभागाच्या अधिका:यांनी चौकशी करणे गरजेचे आह़े

मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आह़े त्यामुळेच जिल्हाधिका:यांनी स्वत: याप्रकरणी लक्ष घातले आह़े

16 लाभार्थी पुढीलप्रमाण़े़़

4लाभार्थी व कंसात गाव- पंडित सोमा ठेलारी (अजनाड), केवळसिंग रूपसिंग राजपूत (वाडी), रजनीबाई युवराज कुमावत (रूदावली), जगन कालुसिंग पावरा (गधडदेव), कलाबाई मनोहर पाटील (उखडवाडी) भीमसिंग गोरख राजपूत, (लौकी), दाजीमल पांडय़ा पावरा (कोडीद) पंडित सोमा ठेलारी (अजनाड) कालुसिंग सीतू पावरा (वकवाड) सीताराम लाकडय़ा पावरा (ङोंडेअंजन) रूख्मीबाई भीमसिंग राजपूत (लौकी) राजेंद्र गोपाळ धोबी (सांगवी) काळू नवल भिल (तांडे), चंद्रसिंग सु:या पावरा (चाकडू), जगन कालूसिंग पावरा (गधडदेव), प्रताप आनंदा मराठे (भाटपुरा) या लाभार्थीना अनुदान देण्यात आले आह़े मात्र त्यांच्या क्षेत्रात झाडेच लावण्यात आलेली नाहीत़ दरम्यान यात दोन लाभार्थीच्या दोनदा नावे आहेत व मंजूर रोपांची संख्यादेखील वेगवेगळी आह़े

शिरपूर तालुक्यात रोहयोंतर्गत फळबाग लागवडीचे 18 लाभार्थीना अनुदान ेदेण्यात आले आह़े मात्र झाडेच लावण्यात आलेली नाहीत़ त्यामुळे कृषी विभागाच्या संबंधित अधिका:यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असा प्रस्ताव कृषी विभागाच्या आयुक्तांना पाठविण्यात आला आह़े

- अण्णासाहेब मिसाळ

जिल्हाधिकारी