शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मालपूर येथे बागायती शेती सोडून गावाला पुरवतात स्वखर्चाने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 16:23 IST

ग्रामस्थ व गुरांसाठी स्वखर्चाने केली पाईप लाईन

ठळक मुद्दे२२ एकर शेतीतील उत्पन्नावर सोडले पाणीस्वखर्चाने पाईपलाईन करीत ग्रामस्थ व गुरांसाठी उपलब्ध करून दिले पाणीगेल्या अडीच महिन्यांपासून मालपूर येथे सुरु आहे टँकर

आॅनलाईन लोकमतअमळनेर,दि.३० : सततचा तीन वर्षांचा दुष्काळ, त्यात शेतीचे उत्पन्न नाही, अशा परिस्थितीत स्वत:ची बागायती शेती सोडून गावातील गुरे आणि ग्रामस्थांना स्वखर्चाने पाणीपुरवठा करण्याचे दातृत्व माजी सरपंच तथा प्रा.गणेश पवार गेल्या दीड महिन्यापासून करीत आहेत.अमळनेर तालुक्यात काही गावांना दीड वर्षापासून टँकर सुरू आहे. सध्या ४५ गावांना टँकर सुरू आहेत. पाण्याचे स्रोत कमी होत असल्याने जनतेचे पाण्यासाठी हाल होत आहेत. तालुक्यातील धार मालपूर येथे गेल्या अडीच महिन्यांपासून टँकर सुरू आहे. मात्र तत्पूर्वी गेल्या सहा महिन्यांपासून गुरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने गणेश पवार यांनी स्वत:च्या शेतातून पाईप लाईन करीत गावातील हाळात पाणी टाकले. त्यामुळे गुरांचे हाल थांबले आहेत. दीड महिन्यापासून टँकरचे पाणी अपूर्ण पडत होते. ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी गणेश पवार यांनी स्वखर्चाने पाईप लाईन टाकली. ग्रामपंचायतीच्या मोठ्या प्लॅस्टिकच्या टाकीत हे पाणी टाकून ग्रामस्थांना मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.२२ एकर शेतीतील उत्पन्नावर सोडले पाणीग्रामस्थांना पाणी मिळावे यासाठी त्यांनी स्वत:च्या २२ एकर बागायती शेतीमधील उत्पन्न घेणे बंद केले आहे. गावासाठी उत्पन्न न घेता फक्त गुरांना चारा मिळेल इतकेच पाणी स्वत:च्या शेताला देऊन ते गावासाठी पाणी देत आहेत. २२ एकर शेतीमध्ये उत्पादन घेऊन त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न घेता आले असते. मात्र त्यांनी ते टाळले. त्यांच्या या दातृत्वामुळे मालपूर ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेर