शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

धरणगावात कोरोना वीरांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 19:10 IST

स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोरोना काळात असामान्य कामगिरी बजावणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांचा 'कोरोना वीर' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रांत विनय गोसावी यांच्या हस्ते हा सन्मान झाला.

धरणगाव, जि.जळगाव : स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोरोना काळात असामान्य कामगिरी बजावणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांचा 'कोरोना वीर' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रांत विनय गोसावी यांच्या हस्ते हा सन्मान झाला.प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे, कर्तव्यचे अध्यक्ष सुनील चौधरी, एनसीसी मेजर डी.एस.पाटील, पत्रकार बी.आर.महाजन मंचावर उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार आरोग्य विभागाच्या वतीने स्मृतीचिन्ह तथा गौरवपत्र देऊन करण्यात आला.कोरोना काळात सख्खी, जवळची नाती दूर गेली, पण शासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस यांनी नाती जोडून सेवाभाव जपला. शहरातल्या माणसांना आपल्या गावचे आणि रुग्णांना ग्रामीण रुग्णालयाचे महत्त्व समजले, असे भावनिक कथन एरंडोल विभागाचे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी केले. सत्कारप्रसंगी ते बोलत होते.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय सोनवणे, डॉ.गिरीश चौधरी, डॉ.छाया बोरसे, डॉ.रोहिणी अतुल शिंदे, डॉ.संदीप वसंत पाटील, डॉ.प्रीती संदीप पाटील, डॉ.श्रीकांत पाटील, डॉ.कृष्णा मगर, डॉ.करण पाटील, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ.सारिका पाटील, डॉ.मयूर हिवरकर, डॉ.रितूल पाटील, डॉ.दीपक ठाकूर, डॉ.महेश कोंबळे, डॉ.मोशे बारेला, डॉ.विनय कुमट, जयश्री राव, अनिल बोरसे, दिनेश बडगुजर, सुवर्णा पाटील यांचा आणि धरणगावच्या गौतम नगर, संजय नगर परिसरात रुग्णांची तपासणी करून कोरोना जनजागृती मार्गदर्शन करणारे दंतचिकित्सक डॉ.निपुण संजीवकुमार सोनवणे यांना कोरोनावीर पुरस्कार स्मृती सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.प्रास्ताविक आर.डी.महाजन व नाजनिन शेख यांनी केले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश महाजन, अरविंद चौधरी, सागर पाटील, अमोल चौधरी, गोपाल चौधरी आणि योगेश ठाकरे यांनी परिश्रम घेतले.