शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसोबतच उद्योजकांचाही सन्मान - खासदार उन्मेष पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:08 IST

औद्योगिक वसाहतीतील प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही

जळगाव : शेतक-यामुळे ज्या प्रमाणे सर्वांना अन्नधान्य मिळते, त्याप्रमाणे उद्योगांमुळे रोजगाराचीही निर्मिती होऊन आर्थिक सुबत्ता येते, त्यामुळे उद्योगांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी ‘लोकमत’ भेटीत दिली. शेतकऱ्यांप्रमाणे उद्योजकांनाही सन्मान देण्यावर भाजप सरकारचे धोरण आहे, असाही उल्लेख त्यांनी केला.पालकत्व स्वीकारून समस्या सोडवूजळगावातील औद्योगिक वसाहतीमध्ये सुविधा पुरविण्याबाबत महानगरपालिका व औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्यातील वादामुळे एमआयडीसीचा विकास खुंटून तेथील उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याच्या मुद्यावर बोलताना खासदार पाटील म्हणाले की, मनपापेक्षा एमआयडीसी ही आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्था आहे. त्यामुळे एमआयडीच्या अधिकाºयांसोबत बैठक घेऊन त्यांना सुविधा पुरविण्यावर सूचना देऊ. या सोबतच आता शेळगाव बॅरेजच्या कामामुळे पाण्याचाही प्रश्न मार्गी लागणार असल्याने एमआयडीसीत उद्योग वाढू शकतात, असे सांगून येथील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण एमआयडीसीचे पालकत्व स्वीकारू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून दिली.लघु उद्योगांसाठी प्रयत्न करणारआज अनेक विद्यार्थी पदवी घेतात, मात्र त्यांना प्रात्यक्षिक करणे शक्य नसते. त्यामुळे हा ‘स्कील गॅप’ दूर करण्यासाठी आपला भर आहे. या सोबतच जळगावात लघु उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करून रोजगार निर्मितीसाठीही पाठपुरावा करु अशी ग्वाही खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.स्थानिक उद्योगांसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’उद्योजकांकडे दरोडेखोर म्हणून राजकारणी पाहत असतात, मात्र भाजपचे तसे धोरण नाही. उद्योजकांसाठी सोयी-सुविधा मिळाल्याच पाहिजे, यासाठी सरकारचे प्रयत्न असून जळगावातही येथील स्थानिक चटई, पाईप उद्योगासह हळद, दूध, कापूस, केळी यांच्यावरील प्रक्रिया उद्योगासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचेही नियोजन असल्याचे खासदार पाटील म्हणाले.व्यापाºयांचेही प्रश्न सोडविणारव्यापारी बांधवांविषयी सरकारला सन्मान आहे. त्यामुळे जीएसटीमध्ये वारंवार बदल करण्यात आले. आताही जळगावातील व्यापाºयांचे विविध करांचे प्रश्न असो अथवा गाळ््यांचा मुद्दा, यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव