शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

यावल येथे मातृवंदना कार्यक्रमात मातांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 01:35 IST

समाजातील मातृशक्तीचे दर्शन व्हावे व मातृप्रेमाचा सन्मान व्हावा म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मातांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

ठळक मुद्देविविध क्षेत्रात कार्यरत मातांचा गौरव२५वा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम मोठ्या स्वरुपात करणारमातृवंदना कार्यक्रमामुळे मन:शांती मिळते- आचार्य महामंडलेश्ववर जनार्दन हरीजी महाराज

यावल, जि.जळगाव : मातृत्वास पारखे झालेल्या कै.पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मातृवंदना कार्यक्रमामुळे मन:शांती मिळते, आनंद मिळतो, स्वत:ला प्रेरणा व उर्जा मिळते, असे प्रतिपादन फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष परमपूज्य आचार्य महामंडलेश्ववर जनार्दन हरीजी महाराज मंगळवारी येथील मधुर संस्कार केंद्राच्या वतीने व सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मातृहृदयी साने गुरूजी यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित मातांचा सन्मान सोहळा 'मातृवंदना' या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.येथील सरस्वती विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक पी. आर.पाटील यांच्या संकल्पनेतून पूज्य साने गुरुजींच्या जयंतीच्या औचित्याने गेली सोळा वर्षे झाले मातृवंदना कार्यक्रम येथे साजरा होत आहे. यावेळी समाजातील मातृशक्तीचे दर्शन व्हावे व मातृप्रेमाचा सन्मान व्हावा म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मातांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. येथील श्री गजानन महाराज मंदिरात परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली, माजी कुलगुरू डॉ. के. बी.पाटील व सेवानिवृत्त प्रा.कमल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.सुरुवातीस आचार्य महामंडलेश्वर जनार्दन महाराज, माजी कुलगुरू डॉ.के.बी. पाटील, प्रा. कमल पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर प्रा.व.पु. होले यांनी प्रास्ताविक केले. माजी कुलगुरू डॉ.के.बी. पाटील म्हणाले, की शिक्षण शाळा कॉलेजात जाऊन मिळू शकते, मात्र संस्कार हे केवळ आईकडूनच मिळतात. शिक्षणापेक्षा संस्कार मोठा आहे. शिकलेल्या सुशिक्षितांपेक्षा अशिक्षित अडाणी लोकच आईचा सांभाळ व्यवस्थित करतात, मात्र शिक्षित लोक वृध्दाश्रमाचा मार्ग धरतात ही आजच्या साक्षर दुनियेतील शोकांतिका आहे. प्रा.कमल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. महामंडलेश्वर आचार्य जनार्दन महाराज यांनी मातृवंदना कार्यक्रमाचा २५वा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम मोठ्या स्वरुपात करू, अशी घोषणा त्यांनी केली. सत्कारमूर्ती रोहिणी पाटील, शाबेरा तडवी, जनाबाई झांबरे यांनीही सत्काराला उत्तर देणारे मनोगत व्यक्त केले.यांचा झाला सन्मान : शशिकला वासुदेव बडे (पातर्डी, जि.अहमदनगर), केवल ग्यानसिंग पाटील (खडकेसीम, एरंडोल), अलका लक्ष्मण बेंडाळे (सावदा), इंदुमती मंगेश मालखेडे (खिरोदा), रोहिणी रूपचंद पाटील (पुणे), जनाबाई पंढरीनाथ झांबरे, (वराडसीम, भुसावळ), शाबेरा मेहमूद तडवी (सौखेडासिम, ह.मु.मुंबई), सुलोचना भीमराव देशमुख (पोळ, जि.नाशिक), आशाबाई सीताराम पारधी (चोपडा), कमलताई सुरेश चौधरी (मुंबई ) या मातांचा प्रातिनिधिक सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमात प्रा.राजेंद्रसिंह राजपूत, मधुराणी पाटील, निर्मल चतुर यांनी सूत्रसंचालन केले, तर बी.एन. पाटील यांनी आभार मानले. सन्मान सोहळ्यासाठी मधुर संस्कार केंद्र परिवाराचे सहकार्य लाभले.

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल