बोदवड येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 01:13 AM2020-11-04T01:13:04+5:302020-11-04T01:13:18+5:30

कोरोना योद्ध्यांचा सन्मान मंगळवारी व्यापारी संघटनेतर्फे करण्यात आला.

Honor of Corona Warriors at Bodwad | बोदवड येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

बोदवड येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

Next

बोदवड : गत सहा महिन्यांपासून आपल्या कर्तव्यात कोणतेही कसूर न ठेवता सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या परीने मदतकार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान मंगळवारी व्यापारी संघटनेतर्फे करण्यात आला.
शहरातील अग्रसेन भवनाच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता तहसीलदार, पोलीस प्रशासन तसेच आरोग्य विभाग, नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाच्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला,
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ अग्रवाल, उपाध्यक्ष राजेश नानवाणी, उद्योजक अरविंद बरडिया, कैलास जावरे, नगराध्यक्षा मुमताजबी बागवान, तहसीलदार हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, शेतीनिष्ठ शेतकरी विकास कोटेचा, नगरसेवक दीपक झांबड] भाईदास मालचे, गोपाल गव्हाळे, मुकेश पाटील आदी उपस्थित होते.
कोरोना योद्धा म्हणून बोदवद पोलीस निरीक्षकांसह समस्त पोलीस कर्मचारी व इतरांना सन्मान चिन्हासह गौरवण्यात आले. सूत्रसंचालन दीपक चौधरी यांनी केले.

Web Title: Honor of Corona Warriors at Bodwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.