लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : बँकेच्या कॅशियरकडून जादा दिलेली रक्कम सराफाच्या दुकानावर लक्षात आल्यावर मुख्याध्यापकाने ती प्रामाणिकपणे परत केली आहे.
लोंढवे येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश पंढरीनाथ महाजन हे धनादेश वटवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेले असता कॅशियरने त्यांना पाच हजार रुपये जास्त दिले. महाजन यांनी पैसे न मोजता सरळ सराफ बाजारात सोन्याच्या दुकानवर गेले असता त्यांना पाच हजार रुपये जास्त आल्याचे लक्षात येताच त्यांनी ताबडतोब बँकेत येऊन ती रक्कम परत केली. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल व्यवस्थापक संजय पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी व्ही. बी. सोनवणे, सुभाष पाटील, आर. बी. पाटील, कॅशियर स्वप्नील पाटील हजर होते. शिक्षकांमध्ये प्रामाणिकपणा शिल्लक असल्याबद्दल कौतुक करण्यात आले. प्रामाणिकपणाचे मूल्य स्वतः मुख्याध्यापक जोपासत असल्याने शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते आदर्श ठरतील.