शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला यंदा गवळी बांधवांचे घरगुती सगर पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 12:06 IST

कोरोनामुळे रेड्याची झुंज यंदा रद्द करण्यात आली.

ठळक मुद्देकोरोनामुळे रेड्याची झुंज नाहीअनेक वर्षांची परंपरा प्रथमच झाली खंडित

चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव पंचक्रोशीत गवळी बांधवांचा दिवाळी पर्वणीवर साजरा होणा-या सगर पूजन उत्सवाला मोठी परंपरा आहे. यावर्षी कोरोनामुळे ही परंपरा प्रथमच खंडीत झाली. रेड्यांच्या झुंजी झाल्या नसल्या तरी, रेड्यांचे घरगुती पूजन मात्र झाले. दरवर्षी दिवाळीला पाडव्याच्या दिवशी सगर पूजन होऊन रेड्यांच्या झुंजी रंगतात.चाळीसगाव पंचक्रोशीत शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. चा-याची मुबलकता असल्याने येथे गवळी बांधवांची मोठी वस्ती आहे. त्यांच्याकडून गायी - म्हशींचे पालन करुन दूध विक्रीचा व्यवसाय केला जातो. पशुपालन करणा-या गवळी समाजही येथे मोठ्या संख्येने आहे.रेड्यांना वर्षभर खास खुराक खाऊ घालून सगर लढतीसाठी तयार केले जाते. याबरोबरच त्यांच्या अंगावर रंगरंगोटी करुन काही प्रमाणात लढतीचे प्रशिक्षणही देतात. पाडव्याच्या दिवशी तयार रेड्यांना लढतीसाठी उतरविले जाते. यासाठी जिंकणा-या रेड्यांच्या मालकांना बक्षिसेही दिली जातात.तितूर नदीपात्रात उडतो थरारदिवाळीतील पाडव्याच्या दिवशी गवळी बांधवांमध्ये मोठा उत्साह असतो. यादिवशी रेड्याची अंघोळ करुन त्याच्या अंगावर आकर्षक रंगकाम करण्यात येते. दुपारी लढतीत उतरणा-या रेड्यांची गोठ्यापासून वाजत - गाजत मिरवणूक काढली जाते. सायंकाळी हिरापूर रोडलगतच्या तितूर नदीपात्रात रेड्यांच्या लढतींची धुमश्चक्री उडते. पूर्ण ताकदीनिशी हे रेडे एकमेकांना भिडतात. हा थरार पाहण्यासाठी शौकिनांसह नागरिकांची मोठी गर्दी होते असते. यावर्षी कोरोनामुळे पोलिसांनी रेड्यांच्या झुंजीला परवानगी दिली नाही. त्यामुळे रेड्यांचे घरगुती पूजन केले गेले.सगर पूजन हा आमचा मोठा उत्सव असतो. वर्षभर गवळी बांधव याची वाट पाहत असतात. रेड्यांना लढतीसाठी तयार केले जाते. यावर्षी कोरोनामुळे हे सर्व थांबले. मात्र रेड्यांची सजावट व घरगुती पूजन आवर्जून करण्यात आले. रेड्यांची झुंजी झाल्या नाहीत.- पप्पू पहिलवान गवळीभडगाव रोड, गवळीवाडा, चाळीसगाव.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमChalisgaonचाळीसगाव