शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरात १० हजारावर रुग्णांचे गृह विलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 21:25 IST

पहिला कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर १ जूनपासून आतापर्यंत १० हजार ५४० जणांंचे गृह विलगीकरण म्हणजेच होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देहोम क्वारंटाईन केलेल्यांकडून चकवापोलिसांकडून समज

विनायक वाडेकरमुक्ताईनगर : तालुक्यात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर १ जूनपासून आतापर्यंत १० हजार ५४० जणांंचे गृह विलगीकरण म्हणजेच होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, होम क्वारंटाईन केलेल्यांनी घरीच थांबावे, असे प्रशासनाचे निर्देश आहेत. मात्र काही महाभाग घरी न थांबता, थेट रस्त्यावर फिरताना दिसतात. हातावर होम ‘क्वारंटाईन’चा शिक्का पाहिल्यावर पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर ते त्यांना समज देत असल्याचे चित्र आहे.तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १ जून रोजी आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत जवळपास ५२७ रुग्ण हे पॉझिटिव्ह असून, त्यापैकी ३८३ रुग्ण उपचार घेऊन ते घरी परतले आहेत. दरम्यान, सद्य:स्थितीत कोरोनाचे ११७ रुग्ण असून, ते मुक्ताईनगर येथील विविध सेंटरमध्ये उपचार घेत आहेत, तर १० रुग्ण मयत झाले आहेत.तालुक्यात आरोग्य विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी आहे. असे असतानाही आतापर्यंत ५२७ पॉझिटिव्ह रुग्णांच्या हाय आणि लो रिस्कमध्ये येणाºया जवळपास १० हजार ५४० जणांना घरी विलगीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एका रुग्णामागे २० जणांची तपासणी करून त्यावर उपचार करणे व लक्षणे जाणवत असलेल्यांना रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात हलवणे यासारख्या प्रक्रिया वेगाने केल्या जात आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे गुणोत्तर प्रमाण हे अव्वल असल्याचे श्रेय उपजिल्हा रुग्णालय व तालुका वैद्यकीय कार्यालय या दोघांना जाते.आजच्या तारखेला हाय रिस्कमधील २४ रुग्णांची मुक्तता करण्यात आली आहे. आठ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलेश पाटील व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे यांनी दिली.दरम्यान, ज्यांना होम क्वारंटाईन अर्थातच घरी विलगीकरण केले आहे त्यांच्याकडून मात्र नियमांची पायमल्ली होताना दिसून येत आहे. होम क्वारंटाईन शिक्के असलेले अनेकजण बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागात तर असे प्रकार जास्त आढळून येत असले तरी मुक्ताईनगर शहरातदेखील अनेक जण होम क्वारंटाईन असूनही रस्त्यावर फिरताना आढळून येत असल्याचे चित्र आहे.तालुक्याच्या ग्रामीण भागातदेखील कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. डोलारखेडा आणि अंतुर्ली या दोन गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. त्यानुसार उपाययोजनादेखील स्थानिक पातळीवर आणि वैद्यकीय पातळीवर करण्यात येत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर