शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात भुसावळ व जळगाव डाक विभागातर्फे ग्राहकांना घरपोच सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 14:43 IST

लॉकडाऊन काळात डाक विभागातील सर्व उप डाकघरे, शाखा डाकघरे व भुसावळ व जळगाव प्रधान डाकघर व विभागीय कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी जनतेला जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.

भुसावळ : लॉकडाऊन काळात भुसावळ व जळगाव डाक विभागातील सर्व उप डाकघरे, शाखा डाकघरे व भुसावळ व जळगाव प्रधान डाकघर व विभागीय कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी जनतेला जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील सर्व डाकघरातील पोस्टमनच्या सहाय्याने इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेमार्फत बँक ग्राहकांना फक्त आधार क्रमांक व मोबाईलच्या (एईपीएसच्या) आधारे त्यांच्या कोणत्याही बँक खात्यातून काढण्याची सुविधा निशुल्क उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे शहरात व खेडेगावातच नव्हे तर आदिवासी पाड्यावरसुद्धा ग्रामीण डाक सेवक यांच्यामार्फत घरपोच सुविधा दिली जात आहे. या काळात ६००७४ एईपीएस व्यवहारातून ७१ लाख ३५ हजार ९२७ रुपये रकमेचे वितरण करण्यात आले.संपूर्ण महाराष्ट्र सर्कलमध्ये ३ आॅगस्ट रोजी राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात जळगाव शाखेने २८ लाख एक हजार २८७ रुपये रकमेचे एक हजार ८५९ एईपीस व्यवहार करून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.ग्राहकांनी भुसावळ व जळगाव डाक विभागाअंतर्गत येत असलेल्या सर्व पोस्ट आॅफिसेसमधून सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक पी.बी.सेलूकर यांनी कळविले आहे.एईपीस व्यवहारामुळे लॉकडाऊन काळात वित्तीय समवेशनाचे उत्तम काम सुरू आहे. तसेच कोरोनासंदर्भातील सर्व सुरक्षांचे पालन केले जात आहे. सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मनीष तायडे यांनी केले आहे.

टॅग्स :MONEYपैसाBhusawalभुसावळ