संजय पाटीलअमळनेर, जि. जळगाव : राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना विविध उत्सव व सणांकरिता २८ ऑक्टोबरपासून १० नोव्हेंबरपर्यंत शासनाने सुटी जाहीर केली आहे. यावर्षी ह्यकोविड-१९ह्णमुळे दिवस वाया गेल्याने सुटीचा कालावधी कमी करण्यात आला आहे.नियोजनप्रमाणे शाळांना १ नोव्हेंबर ते २० पर्यंत दिवाळीची सुट्टी नियोजित होती मात्र २७ रोजी महाराष्ट्र शासनाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी शासन निर्णय जाहीर करून उद्या २८ पासून शाळांना सुटी जाहीर केली आहे. या दरम्यान ऑनलाईन व ऑफलाईन अध्यापन कामकाज बंद राहील, असेही निर्णयात म्हटले आहे.नुकत्याच ४ ऑक्टोबर रोजी राज्यातील शाळा सुरू झाल्या होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सुटी कालावधी कमी करण्यात आला आहे.
राज्यातील शाळांना उद्यापासून सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 14:12 IST