पारोळा, जि. जळगाव : पारोळा तालुक्यातील मंगरुळ येथे कैलास पाटील (४२, रा. मंगरुळ, ता. पारोळा) यांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी हा खून झाल्याची माहिती मिळत असून या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पारोळा तालुक्यातील मंगरुळ येथे इसमाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:16 IST