शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कृउबा संचालकांच्या अपात्रतेवर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 19:39 IST

अपात्र संचालकांची याचिका फेटाळली : सतीश शिंदेंंचा मार्ग मोकळा

पाचोरा, जि.जळगाव : पाचोरा-भडगाव उत्पन्न बाजार समितीतील सत्ताधारी शिवसेनेचे सभापतीसह सात संचालकांच्या अपात्रतेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्कामोर्तब केले आहे.पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्ताधारी शिवसेनेचे १८ पैकी १० संचालक निवडून आले होते. मात्र सत्ताधारी संचालकांविरुध्द गैरव्यवहार व निवडून आलेल्या मतदारसंघाचे सद्य:स्थितीत प्रतिनिधी नसल्याचे सिद्ध झाले. यामुळे दाखल तक्रारीच्या आधारे ७ मार्च २०१८ व ३ जुृलै २०१८ रोजी जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी सभापतीसह सात संचालकांना अपात्र घोषित केले होते. याविरूध्द अपात्र संचालकांनी मुंबई येथे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे अपील दाखल केले असता २० जुलै २०१८ रोजी अपिल फेटाळण्यात आले होते. त्याविरुध्द पुन्हा अपात्र संचालकांनी नाशिक येथील सहनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांच्याकडे स्थगिती मागितली असता सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी स्थगिती अर्ज फेटाळला होता. पुन्हा अपात्र संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन संचालकपद कायम ठेवण्यासाठी व १३ आॅगस्ट २०१८ रोजी होणारी सभापतीपदाची निवड थांबविण्यासाठी याचिका दाखल केली असता त्यावर सुनावणी झाली. १० आॅगस्ट रोजी न्यायाधीश सुनील देशमुख यांच्या खंडपीठाने अपात्र संचालकांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे १३ आॅगस्ट रोजी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपा व राष्ट्रवादीच्या संचालकांच्या सहकार्याने सतीश परशराम शिंदे यांची सभापतीपदी वर्णी लागणार आहे. या निकालामुळे पाचोरा तालुक्याच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळणार आहे.याचिकाकर्ते उध्दव मराठे, विकास पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड.अजित काळे व अ‍ॅड.धनंजय ठोके यांनी काम पाहिले तर सतीश शिंदे व अ‍ॅड.विश्वासराव भोसले, अमोल शिंदे, नरेंद्र पाटील , दिलीप पाटील, शंकर बोरसे यांच्यातर्फे अ‍ॅड.वसंतराव साळुंखे, अ‍ॅड.परेश पाटील व अ‍ॅड. विशाल सोनवणे यांनी काम पाहिले.