शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खान्देश मिल जागेच्या चौकशीस उच्च न्यायालयाची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 12:34 IST

जागा राजमुद्राचीच : जिल्हा न्यायालयाने दिले होते चौकशीचे आदेश

जळगाव :  खान्देश मीलची जागा शासनाची आहे किंवा नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करुन तीन महिन्याच्या आत निकाल देण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. १२ जून रोजी खंडपीठाने आदेश जारी केले आहेत. दरम्यान, खान्देश मीलची जागा ही राजमुद्राचीच असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे.राजमुद्रा कंपनीने डीआरटी औरंगाबाद कोर्टामार्फत खान्देश मीलची जागा २००३ मध्ये खरेदी केली आहे. या जागेच्या विक्रीबाबत राष्टÑीय गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत रामदास पाटील व इतरांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये या जागेची विक्री व राजमुद्राची मालकी कायम केली होती. असे असतानाही सूर्यकांत पाटील यांनी पुन्हा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीक्ष जी.ए.सानप यांच्या न्यायालयात अपील दाखल करुन ही जागा शासकीय असल्याचा दावा केला होता. न्यायालयाने पाटील यांचे अपील २० एप्रिल २०१९ रोजी अंशत: मान्य करुन खान्देश मिलची जागा शासकीय आहे किंवा नाही? याबाबत चौकशी करुन तीन महिन्याच्या आत निकाल देण्याचे आदेश न्या.सानप यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे या जागेचा वाद पुन्हा उफाळून आला होता. न्या.सानप यांच्या आदेशाविरुध्द राजमुद्रा कंपनीने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. न्या.रवींद्र घुगे यांच्या समक्ष १२ जून रोजी सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशास व चौकशीस स्थगिती दिली. राजमुद्रातर्फे अ‍ॅड.सत्यजित बोरा यांनी युक्तीवाद केला.न्यायालयात याचिका व अर्जांना निर्बंधराजमुद्रा कंपनीच्या मालकीबाबत अनेक याचिका, अर्ज व प्रकरणे वेगवेगळ्या व्यक्तींमार्फत न्यायालयात, प्राधिकरणात दाखल झाल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने या जागेवर राजमुद्राचीच मालकी असल्याचा आदेश दिल्याने यापुढे याविषयी याचिका, आव्हान तसेच अर्ज कोणत्याही न्यायालयात, प्राधिकरणात दाखल होऊ शकत नाही, असे आदेश २० मे २०१५ रोजी दिला होता.

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगाव