शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

केरळ पूरग्रस्ताना विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:57 IST

सात तासात जमविली १५ हजारांची रक्कम

चोपडा, जि.जळगाव : केरळ येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात प्रचंड वित्तहानी व नुकसान झाले आहे. शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले असून त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील सेवाभावी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन मदत निधी संकलनाचे काम केले आहे. त्यांना संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय (कनिष्ठ व वरीष्ठ), शिक्षण शास्त्र विद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय येथील परिसरात फिरून विद्यार्थ्यांकडून व शहरातील नारायणवाडी, मेन रोड या भागात फिरून निधी संकलन करण्यात आले.या निधी फेरीला सर्वसामान्य, मान्यवर, विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांसह विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने मदत केली. त्यात या विद्यार्थ्यांनी सात तासांत पंधरा हजारांची रक्कम जमा केली आहे.प्रा.प्रदीप पाटील, प्रा.संदीप भास्कर पाटील यांच्या सहकार्याने महाविद्यालयीन प्रतिनिधी अनिल बाविस्कर, लोकेश लाटे, मंगेश पाटील, दिव्यांक सावंत, चेतन बाविस्कर, अक्षय पाटील, भुवनेश्वरी पाटील, सनी पाटील, अक्षय वैद्य, समाधान सोनवणे, नरेंद्र मैराळे, कामिल तडवी, विश्वनाथ चौधरी, तन्वीर पिंजारी, दिनेश पाटील, सिकंदर तडवी, लीलाधर बाविस्कर, परेश पवार, छाया काविरे, उर्वेश साळुंखे, शुभम तडवी, तुषार साळुंखे यांनी निधी संकलनाचे काम केले.नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केले आहे. दरम्यान, सर्व निधी संकलन झाल्यानंतर केरळ राज्यातील पूरग्रस्तांसाठी पाठविला जाणार आहे.

टॅग्स :floodपूरChopdaचोपडा