बोदवड : तालुक्यातील सुरवाडे गावात राहणाऱ्या कस्तुराबाई फकीरा सोमवंशी (वय ८०) या गरीब अंध वृद्धेच्या जीवनात कुणाचाही आधार नसल्याने अंध:कारमय झाले आहे. अशा या वृद्धेला आभाळमाया फाउंडेशनने गृहोपयोगी वस्तू भेट देत मदतीचा हात दिला आहे.या वृद्ध महिलेचे दु:खद जीवन पाहता संस्था तिच्यासाठी पुढे सरसावली आहे. कस्तुराबाईला एकुलता एक मुलगा असून तोही, मनोरुग्ण आहे. मंगल फकिरा सोमवंशी (वय ४५) असे या मुलाचे नाव आहे. अत्यंत गरिबी असून घरात लाईट नाही. घरही पडके आहे. घराला दरवाजाही नाही. वृद्धत्वामुळे तिला अंधत्वही आले आहे. मुलगा मनोरुग्ण असल्याने त्याला आंघोळ घालण्यापासून तर स्वयंपाक करणे, धुणे भांडी करणे एवढेच नव्हे तर शौचालयाला नेणे ही सर्व कामे कस्तुराबार्इंनाच करावीच लागत आहेत. यामुळेच संस्थेने तिला मदतीचा हात दिला आहे.आभाळमाया फाउंडेशन यांच्याकडून सदर वृद्धेला गृहउपयोगी वस्तू व चादर देण्यात आल्या. यावेळी फाउंडेशनचे सदस्य गोपाळराव पाटील, पोलीस पाटील जिल्हा सरचिटणीस महेश आहिर, अनिल संभाजीराव पाटील तसेच गावातील फाउंडेशनच्या सदस्या हेमलता पाटील, गणेश पाटील, बाळु पाटील, मनोहर सुरवाडे, सुपडु जवरे उपस्थित होते. जितू पाटील, मुकेश गोसावी महाराज, यशवंत महाराज, राहुलजैस्वाल, प्रशांत पाटील, रवींद्र पाटील, चंद्रकांत पाटील, गोपाल गोंधळी, भगवान पाटील, सचिन कोशे, कैलास पाटील, किशोर जैन, जितेंद्र पाटील, प्रमोद पाटील, समाधान पाटील, रमेश पाटील, प्रदीप सुकाळे, भागवत पाटील, सीमाताई बांते, शिवाजीराव पाटील, रवींद्र पाटील आदींचे सहकार्य लाभले.योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्नआर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही शासनाचा कुठल्याच लाभ कस्तुराबार्इंना मिळालेला नाही. अशा स्थितीत जीवन जगत असलेल्या या वृद्ध महिलेची दखल सामाजिक कार्य करणाºया आभाळमाया या संघटनेने घेत त्याना गृहोपयोगी साहित्यांची भेट देत शासन दरबारी त्यांच्या हक्काच्या घरकूलसाठी तसेच रेशनिग कार्डसाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
अंध व निराधार वृद्धेला मिळाला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 21:23 IST