शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

वडली, पाथरी परिसरात मुसळधार पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:29 IST

मातीचे बंधारे वाहून गेले

जळगाव : दिर्घ प्रतिक्षेनंतर तालुक्यातील वडली, पाथरी, सामनेर, लासगाव (ता.पाचोरा) या परिसरात मंगळवारी सायंकाळी सहा ते सात मुसळधार पाऊस झाला. या पहिल्याच पावसात गावातील नद्या व नाल्यांना पूर आला असून वडली व पाथरी येथे रस्त्यावर बांधण्यात आलेले मातीचे बंधारे वाहून गेले आहेत. दरम्यान, या पावसामुळे पाचोरा व जळगावकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.जून महिना संपण्यात आला तरी पाऊस येत नसल्याने शेतकरी चिंतेत होता. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कापसाची लागवड केली, मात्र विहिरी व कुपनलिका आटल्याने हे पीकेही धोक्यात आली होती तर कोरडवाहू शेतकºयांनी पेरणीच केलेली नव्हती. सर्व शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. अशातच मंगळवारी सायंकाळी सहा वाजता वडली, पाथरी, सामनेर, बांबरुड, लासगाव या भागात अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल एक तास मुसळधार पाऊस झाल्याने नदी व नाले एक झाले होते. सामनेर व नांद्रा परिसरात वृक्ष उन्मळून पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.शेतातील पीके वाहिल्याने नुकसानवडली व पाथरी येथे रस्त्याच्या कामासाठी तयार करण्यात आलेले कच्चे रस्ते, पुल व बंधारे पाण्यात वाहून गेल्याने तेथे आलेल्या पुरामुळे वाहने ओलांडून जावू शकत नव्हते.पाणी ओसरल्यानंतर लोखंडी सळई व पाट्या टाकून वाहनांमधील प्रवाशांना इतरत्र हलविण्यात आले.पाथरी येथे महेंद्रसिंग विजयसिंग पाटील यांच्या शेतातील पीके वाहून गेली. रस्त्याच्या कामामुळे या शेतकºयाचे नुकसान झाले आहे. कंत्राटदाराला सूचना देऊनही त्याने कामात सुधारण केली नसल्याचे शेतकºयाचे म्हणणे आहे. वडली येथे पुल पाडून मातीचा भराव करुन पर्यायी कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. हा पुल व रस्ताही वाहून गेला आहे.कच्चे पूल व मातीचे भराव वाहून गेल्यामुळे रस्ताच बंद झाल्याने वावडदा येथून म्हसावद, माहेजी मार्गे पाचोराकडे वाहतूक वळविण्यात आली. पाचोराकडून येणारी वाहतूक नांद्रा, माहेजी, म्हसावदमार्गे वळविण्यात आली होती

टॅग्स :Jalgaonजळगाव