शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव : चाळीसगाव, भडगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी; पावसाच्या टक्केवारीने गाठली शंभरी

By ajay.patil | Updated: September 20, 2022 16:43 IST

पाचोरा, धरणगाव, एरंडोलमध्येही जोरदार; बहाळ, पिंपळगाव महसुल मंडळात ढगफुटीसदृश पाऊस

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अनेक तालुक्यांमध्ये तुफान पाऊस होत असून, सोमवारी भडगाव, चाळीसगाव तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी झाली आहे. सलग दोन दिवस या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे कृषी विभागाने तातडीने या भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यासह पाचोरा, एरंडोल व धरणगाव तालुक्यात देखील सोमवारी रात्री व दिवसा देखील जोरदार पाऊस झाला आहे.

सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होत असतो. यावर्षी मान्सून लवकर परतीच्या मार्गाला लागेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती. मात्र, बंगालच्या उपसागरात सातत्याने कमी दाबाचे क्षेत्र विकसीत होत असल्याने मान्सूनचा मुक्काम देखील वाढवला आहे. सोमवारी जिल्ह्यातील गिरणा काठलगतच्या जवळजवळ सर्वच सहा तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे कापूस, सोयाबीन पीकाचे प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी कापूस वेचणीवर आला असतानाच सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पावसाने गाठली शंभरीजिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान एकूण सरासरीच्या ९८ टक्के इतका पाऊस होत असतो. जिल्ह्यात एकूण पावसाची सरासरी ६३२ मिमी इतकी असते. मात्र, २० सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात ६३४ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सलग चौथ्या वर्षी देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

बहाळ, पिंपळगाव महसुल मंडळामध्ये अतिमुसळधार पाऊसचाळीसगाव तालुक्यातील बहाळ महसुल मंडळात एकाच दिवसात तब्बल १४३ मिमी पाऊस झाला आहे. तर पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव या महसुल मंडळात १०७ मिमी पाऊस झाला आहे. दोन्ही महसुल मंडळांमध्ये एकाच दिवसात १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यासह चाळीसगाव मंडळात ८३, शिरसगाव ६७, मेहुणबारे ७५, हातले ८३, तळेगाव ६७, खडकी ७० अशा सर्वच महसुल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर भडगाव तालुक्यातील कजगाव महसुल मंडळात सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी झाली असून, या मंडळात ९४ मिमी पाऊस झाला.

जिल्ह्यात यलो अलर्टबंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जिल्ह्यात २३ पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  पावसासोबतच वीजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी दरम्यान राहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कमी दाबाचे क्षेत्र ज्या प्रकारे मध्यप्रदेश व विदर्भाच्या दिशेने सरकेल त्याच प्रमाणे जिल्ह्यात पावसाचाही वेग वाढण्याचा अंदाज आहे.