शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

रावेरला अडीच हजार मूर्तींचे संकलन करून गणरायाला भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 12:46 IST

रावेर : शहरात न.पा.ने उभारलेल्या नऊ मूर्ती संकलन केंद्रांवर तथा अंबिका व्यायामशाळा, छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा व युवा शक्ती ...

रावेर : शहरात न.पा.ने उभारलेल्या नऊ मूर्ती संकलन केंद्रांवर तथा अंबिका व्यायामशाळा, छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा व युवा शक्ती फाऊंडेशनच्या फिरत्या गणेश रथात शहरवासीयांनी विघ्नहर्त्या श्री गणरायाची मूर्ती समर्पित करून सोमवारी भावपूर्ण निरोप दिला. शहरवासीयांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे न.पा.ने पाच मिनीट्रक व छोट्या मालवाहू गाड्यांमधून सुमारे अडीच हजार श्रींच्या मूर्तींची अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या हस्ते महाआरती करून नांदूपिंप्रीच्या तापी नदी पुलावरून विधीवत विसर्जन करण्यात आले.शहरातील श्री रामस्वामी मठातील मानाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विघ्नहर्त्या श्री गणरायाची मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, नंदकिशोर दलाल आदी कार्यकर्त्यांनी पूजन व आरती करून चार ते पाच कार्यकर्त्यांनी श्री गणरायाला पालखीत विराजमान करून "गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या... च्या गजरात श्री नागझिरी कुंडावर नेली. नागझिरी कुंडावर मंगलमूर्तीची आरती करून दुपारी दीडला मानाच्या बाप्पाचे जड अंतःकरणाने विसर्जन करण्यात आले.दरम्यान, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व न.पा. मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत शहरवासीयांनी आपापल्या परिसरात असलेल्या अष्टविनायक नगरातील श्री साईबाबा मंदिर, सावदा रोडवरील अग्सेन भवन, तिरुपती नगरमधील रोकडा हनुमान मंदिर, श्री स्वामी विवेकानंद चौकातील थड्याचा मारूती मंदिर, श्री शिवाजी चौकातील श्री संत तुकाराम महाराज मंदिर, न.पा.च्या पॉवर हाऊसमध्ये असलेल्या मूर्ती संकलन केंद्रांवर बाप्पा मोरयाला भावपूर्ण निरोप देत समर्पित केले.दरम्यान, अंबिका व्यायामशाळा, छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा व युवा शक्ती फाऊंडेशनच्या फिरत्या श्री गणेश विसर्जन रथावरही भाविकांनी आपल्या घरातील श्रींच्या मूर्ती समर्पित करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरभरून प्रतिसाद दिला.दरम्यान, न.पा.ने पुष्पवेलींनी सुशोभित केलेल्या पाच मिनीट्रक व दोन छोट्या मालवाहू गाड्यांना सुशोभित केलेल्या रथांद्वारे शहरातील नऊ संकलन केंद्रांवरून अडीच हजार श्रीं विघ्नहर्त्या गणनायकाचे मूर्तींचे संकलन करून आठवडे बाजार परिसरात स्थानापन्न करण्यात आले.त्याठिकाणी पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या उपस्थितीत अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या हस्ते श्रींचे पूजन व महाआरती करण्यात आली.दरम्यान, गणेश मूर्तीचे रथ न.पा.ने तापी नदीवरील नांदूपिंप्री पुलावर नेवून पुन्हा विधीवत पूजन करून विघ्नहर्त्या श्री गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. दरम्यान, शहरातील खासगी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार-पाच कार्यकर्त्याच्या उपस्थितीत मंगरूळ धरण, आभोडा धरण, नांदूपिंप्री, भोकरी नदीवरील साठवण बंधार्यात विघ्नहर्त्या श्री गणरायाचे विसर्जन करून भावपूर्ण निरोप दिला.दरम्यान, शहरातील संवेदनशील भागात राज्य राखीव पोलीस दल, धडक पोलीस दल, दंगा नियंत्रण पथक, रावेर पोलीस दल व गृहरक्षक दलाच्या जवानांनी शहर व परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त राखला.शहरातील एक क्विंटल निर्माल्य न.पा.च्या परसबागेतील कंपोस्ट खताच्या खड्ड्यातदरम्यान, शहरातील गणपती संकलन केंद्र व फिरत्या पथकांद्वारे सुमारे एक क्विंटल निर्माल्य संकलन करून न.पा.च्या पॉवर हाऊसमध्ये परसबागेतील कंपोस्ट खताच्या खड्ड्यात टाकण्यात आले. निर्माल्याची धार्मिक भावना पाहता घनकचरा प्रकल्पात न टाकता परसबागेतील कंपोस्ट खतासाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमRaverरावेर