शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात अनोखा सेवाभाव, उदरभरणाच्या अखंड यज्ञकर्मासह जनजागृती व आरोग्य रक्षणाचे व्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 12:54 IST

‘सेवालया’च्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, कृषी, संस्कार व स्वावलंबनाचे धडे

ठळक मुद्देअन्नदानातून रुग्णांना दिलासागरजू आणि दात्यांमधील दुवा

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ११ - उपचारासाठी आलेला गोरगरिब रुग्ण अथवा त्याचा नातेवाईक भुकेल्यापोटी राहू नये यासाठी त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणाऱ्या ‘सेवालय’च्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात रुग्ण सेवा सुरू आहे. वर्षातील एकही दिवसाचा खंड न पडणाºया या उदरभरणाच्या यज्ञकर्मासह सेवालयाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, कृषीविषयक मार्गदर्शन, संस्काराचे धडे देण्याचे व्रतदेखील सेवेकरींनी हाती घेतले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे ‘सेवालय’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध सेवाभावी उपक्रम राबविले जात आहे. यामुळे अनेकांना आधार मिळत आहे. यासाठी शहरासह जिल्ह्यातील सेवेकरींनी स्वत:ला या कार्यात झोकून दिले असून त्यांच्या या कार्याची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी मंगळवारी ‘लोकमत’ कार्यालयात सेवालयाच्या पदाधिकाºयांच्या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी ज्येष्ठ पदाधिकारी दीपक घाणेकर, समितीचे अध्यक्ष मनीष काबरा, सहकार्यवाह संदीप कासार, नरेंद्र शुक्ल, डॉ. रितेश पाटील, पराग महाशब्दे, कीर्तीकुमार पाठक, महेंद्र साखरे, गणेश जाधव, पितांबर कोळी, निंबा सैंदाणे, रेवती ठिपसे, डॉ. रेवती गर्गे, मंगला पाटील, वृषाली तोंडापूरकर, युवराज सपकाळे, अजित तडवी, हर्षल पाटील उपस्थित होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.अन्नदानातून रुग्णांना दिलासाजिल्हा रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण अथवा त्याचे नातेवाईक यांच्या जेवणाची व्यवस्था नसल्यास त्यांना अन्नदानाचे कार्य सेवालयाच्या माध्यमातून गेल्या ४ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. सेवालयाचे सेवेकरी रात्री आठ वाजता रुग्णालयात फेरफटका मारुन अशा रुग्णांची निवड करतात. सकाळी १० वाजता सर्वजण सेवालयाजवळ एकत्र येऊन ११ वाजता सर्वांना जेवण दिले जाते. विशेष म्हणजे या वेळी भोजनमंत्र म्हणत अन्नपूर्णा मातेचे पूजनदेखील केले जाते. शहरात कोणीही नातेवाईक नसताना व जेवण विकत घेऊ शकत नसलेल्यांच्या उदराला या अन्नाचा ज्यावेळी आधार मिळतो, त्या वेळी त्यांच्या चेहºयावर तृप्ततेचे हास्य फुलते, असे अनुभव या वेळी सेवेकरींनी सांगितले.गरजू आणि दात्यांमधील दुवाया अन्नदानासाठी अनेक दानशूर व्यक्ती मदत करीत असतात. कोणाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, पुण्यस्मरण असल्यास त्या निमित्ताने अनेक जण येथे अन्नदान करतात, असे या वेळी सांगण्यात आले. राजकीय मंडळी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांचे यासाठी सहकार्य मिळते. वर्षातील ३६५ दिवस अखंडपणे हे कार्य सुरु असते. मिळणाºया मदतीतून ७० टक्के खर्च अन्नादानावर तर ३० टक्के खर्च इतक सेवाकार्यात केला जातो.‘सेवेचा सत्कार होत नाही...’दानशूर व्यक्ती मदत करीत असताना शहरातील एका दात्याकडे घरकाम करणाºया एका महिलेनेदेखील पुढे येत या अन्नदानासाठी एक महिन्याचे वेतन दिल्याचे या वेळी आवर्जून नमूद करण्यात आले. या बद्दल तिचा सत्कार करण्यासाठी तिला समितीच्यावतीने बोलविण्यात आले असता, त्या महिलेने ‘सेवेचा सत्कार होत नाही...’ असे उत्तर देऊन दातृत्वाची नवी व्याख्याच सर्वांसमोर ठेवली.कपडे, ब्लँकेटच्या माध्यमातून मायेची उबजिल्हा रुग्णालयात अचानक कोणी रुग्ण आला व त्याच्याकडे कपडे नसल्यास अथवा अपघातात कोणाचे कपडे फाटले असल्यास अशा रुग्णांना सेवालयाच्या माध्यमातून कपडेदेखील उपलब्ध करून दिले जातात. इतकेच नव्हे कपड्यांसोबतच ब्लँकेट, शालदेखील उपलब्ध करून दिले जातात.रुग्ण साहित्य केंद्रअपघात अथवा इतर कोणत्याही कारणाने रुग्ण अथंरुणावर पडून राहत असल्यास अथवा त्यास व्हील चेअर, कुबड्यांची गरज असल्यास अशा रुग्णांना हे साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम रुग्ण साहित्य केंद्राच्यावतीने केले जाते.रुग्णमित्रांचा निराधारांना आधारसेवालयाचेच अनेक पदाधिकारी रुग्णमित्र म्हणून येथे काम करीत असतात. रुग्णालयात कोणी बेवारस रुग्ण आल्यानंतर त्यांना केस पेपर काढण्यापासून तर रुग्णालयातून सुट्टी होईपर्यंतची मदत करण्याचे काम रुग्णमित्र करीत असतात. या सोबतच कोणी अनोळखी रुग्ण आल्यास त्याची ओळख पटवून त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्याचे कार्यदेखील रुग्ण मित्र करीत असतात. या बाबतचे अनेक अनुभवदेखील या वेळी सांगण्यात आले.किशोरी विकास उपक्रममुलींच्या विविध प्रश्नांसंदर्भात मार्गदर्शन व जनजागृती करण्यासाठीदेखील सेवालयाच्यावतीने किशोरी विकास उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये मुली तसेच मातांना मार्गदर्शन केले जाते. आता शहरातील प्रत्येक झोपडपट्टीच्या भागासह ग्रामीण भागात मुली तसेच माता यांच्याशी संवाद साधून विविध गैरसमज, प्रश्नांबाबत जनजागृती करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.ग्राम आरोग्य रक्षक योजनादुर्गम भागात आरोग्य सेवा पोहचली नसल्याने अशा गावांमध्ये एका जणाची निवड करून तेथे किमान प्रथमोपचार तरी उपलब्ध करून देण्याचे काम ग्राम आरोग्य रक्षक योजनेच्या माध्यमातून १९९९ पासून सुरू आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यातील ४३ गावांमध्ये ही सेवा केली जात आहे.या सोबतच जलपुनर्भरण, संस्कार केंद्र, जळीत रुग्णांची सेवा, मोठ्या अपघातावेळी मदत कार्य करण्याचे काम सेवालयाचे पदाधिकारी करीत असतात.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव