जळगाव: अमळनेर तालुक्यातील कोळपिंप्री शाळेचे मुख्याध्यापक रामराव पाटील (वय ५२) यांना आत्महत्त्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी व मुडी ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय नारायण पाटील व कांतीलाल काटे यांना जळगावचे अतिरिक्त सत्र न्या.एन.आर.क्षीरसागर यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्या.ए.एम.क्षत्रिय (अमळनेर) यांचा कार्यभार २८ रोजी न्या.क्षीरसागर यांच्याकडे राहिला.अपंग युनिट चालवण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात होता, आपल्या आत्महत्त्येला हे दोघे जबाबदार असल्याचे त्यांनी चिीवर लिहून ठेवत ८ जानेवारी २०१४ ला विषप्राशन करुन मरणाला कवटाळले होते. आरोपीतर्फे जळगावचे ॲड.प्रकाश बी.पाटील, अमळनेरचे ॲड.जी.वाय.विंचूरकर, ॲड.प्रवीण पांडे आणि मृतकाच्या पत्नी व मूळ फिर्यादी शैलजा पाटील यांच्यातर्फे ॲड.हिंमत सुर्यवंशी यांनी काम पाहिले.
मुख्याध्यापकाची आत्महत्त्या, संस्थाचालकाला जामीन
By admin | Updated: May 29, 2014 16:08 IST