शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आधी लोखंडी रॉड मारले डोक्यात नंतर केला तरूणावर चॉपरने वार....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काहीही कारण नसताना अचानक घरात येवून दीपक दगडू भोई यांच्यासह त्यांच्या भावाला व वहिणीला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : काहीही कारण नसताना अचानक घरात येवून दीपक दगडू भोई यांच्यासह त्यांच्या भावाला व वहिणीला चौघांनी बॅट व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना १७ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास इंद्रप्रस्थनगरातील शिवशंकर कॉलनीत घडली. दरम्यान, दीपक यांच्या डोक्यात बॅट मारल्यानंतर चॉपरने सुध्दा हल्ला करण्यात आला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी चार जणांविरूध्द शहर पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक भोई हे शिवशंकर कॉलनीत भाऊ युवराज व भावाची पत्नी कविता यांच्यासह वास्तव्यास आहेत. १७ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दीपक हे दुचाकीने किरकोळ साहित्य घेण्यासाठी किराणा दुकानावर गेले होते. घरी येत असताना, काहीही कारण नसताना हितेन सोनवणे (रा.शिवशंकर कॉलनी) याने त्यांना बॅट मारून फेकली. मात्र, दीपक हे तेथे न थांबता घरी निघून गेले. काही वेळानंतर हितेन व रवींद्र सोनवणे, सोनवणे यांचा जावई (नाव माहित नाही) तसेच पूजा सोनवणे व पुषा सोनवणे हे दीपकच्या घरी आले व त्यास शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. रवींद्र याने त्याच्या हातातील रॉड हा दीपक यांच्या डोक्यात मारला. त्यात ते रक्तबंबाळ झाले. नंतर एकाने त्याच्यावर चॉपरने वार केला. भाऊ युवराज हा भांडण सोडविण्यासाठी आला असता, त्याला देखील रवींद्र याने लोखंडी रॉड मारून जखमी केले. तसेच हितेन याने दीपक यांच्या वहिनी कविता यांना सुध्दा बॅटने हातावर मारहाण केली. या हल्ल्यात दीपक, त्यांचा भाऊ व वहिनी गंभीर जखमी झाले.

तिघांवर उपचार सुरू...

दरम्यान, भोई कुटूंबाला मारहाण होत असल्याचे पाहून रहिवाश्यांनी मध्यस्थी करीत भांडण सोडविले व नंतर जखमी तिघांना रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. शुक्रवारी शहर पोलिसांनी जखमी दीपक यांचे जबाब नोंदविल्यानंतर रात्री हितेन सोनवणे, रवींद्र सोनवणे व त्यांचा जावई तसेच पुजा सोनवणे (सर्व रा.शिवशंकर कॉलनी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.