शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांना हवीय सहानुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 12:38 IST

-अजय पाटीलमनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सध्या शहरात सुरु असलेल्या विशेष अतिक्रमण निर्मूलन कारवाई दरम्यान, अतिक्रमण विभागाने हॉकर्सकडून १० लाख रुपयांच्या वर माल व साहित्य जप्त केले आहे. हा माल घेण्यासाठी हॉकर्सकडून दररोज मनपा प्रशासनाकडे विनवण्या, अर्ज व निवेदने दिली जात आहेत. मात्र, प्रशासनाकडून माल न देण्याबाबत ठाम आहे. यामुळे हॉकर्सने ...

-अजय पाटीलमनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सध्या शहरात सुरु असलेल्या विशेष अतिक्रमण निर्मूलन कारवाई दरम्यान, अतिक्रमण विभागाने हॉकर्सकडून १० लाख रुपयांच्या वर माल व साहित्य जप्त केले आहे. हा माल घेण्यासाठी हॉकर्सकडून दररोज मनपा प्रशासनाकडे विनवण्या, अर्ज व निवेदने दिली जात आहेत. मात्र, प्रशासनाकडून माल न देण्याबाबत ठाम आहे. यामुळे हॉकर्सने आपला मोर्चा नगरसेवकांकडे वळविला असून, जप्त माल मिळावा यासाठी नगरसेवकांच्या माध्यमातूनही प्रयत्न केला जात आहे.दरम्यान, मनपा निवडणूक जवळ आल्यामुळे ज्यांच्याकडून सहानुभुती मिळेल त्यांच्याकडून सहानुभूती मिळविण्यावर नगरसेवकांचा भर दिसून येत आहे. यामुळे अनेक नगरसेवकांकडून मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचारी व अधीक्षकांशी खटके उडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच लवकरच नवीन आयुक्त चंद्रकांत डांगे हे रूजू होणार आहेत. त्यामुळे मनपा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी काही थोड्या दिवसात शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावून आपली बाजू सांभाळण्यावर देखील भर दिला आहे. एकीकडे नगसेवकांना हॉकर्सला पाठींबा देवून निवडणुकांसाठी सहानूभुती मिळून घ्यायची आहेतर आयुक्त पदाचा कार्यकाळात शहरात लावलेली शिस्त यासाठी प्रभारी आयुक्तांची कारवाई, या दोन मुद्यावरुन मनपा प्रशासन व नगरसेवक आमने-सामने आले आहेत. गेल्याच आठवड्यात खाविआ नगरसेवक नितीन बरडे यांचा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक एच.एम.खान यांच्याशी झालेला वाद यासह भाजपाचे गटनेते सुनील माळी यांनी देखील पत्र काढून जप्त करण्यात आलेला माल परत देण्याची केलेली मागणी यावरुन हे स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान, नगरसेवकांच्या वाढत्या दबावाला थारा जप्त करण्यात आलेला मालाचा लवकरच लिलाव करण्याच्या हालचाली देखील मनपाने सुरु केल्या आहेत. दरम्यान, मनपा महासभेने अतिक्रमण कारवाईबाबत ठराव केला होता. या ठरावामध्ये एका हॉकर्सचा माल पहिल्यांदा पकडला तर त्याच्यावर ५०० रुपये दंड ठोठावला जाणार होता. तर दुसऱ्यांदा माल पकडला त्याच्यावर १ हजार रुपये दंड ठोठवण्याचा व तिसºयांदा माल पकडला तर त्याचा माल कायमसाठी जप्त करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र, हा ठराव मनपा प्रशासनाने गेल्याच महिन्यात शासनाकडे विखंडनासाठी पाठविल्यामुळे मनपा प्रशासन व नगरसेवक यांच्यामध्ये वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव