शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घराचे कर्ज फेडण्यासाठी ७० लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून ७० लाख रुपये आणावे, या मागणीसाठी भूषण कॉलनीतील माहेरवाशिणीचा छळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून ७० लाख रुपये आणावे, या मागणीसाठी भूषण कॉलनीतील माहेरवाशिणीचा छळ केल्याप्रकरणी पती संजीव गोपे, सासरे बिरांची गोपे, सासू सुवर्णलता गोपे व पूजा गोपे (सर्व रा. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

भूषण कॉलनीतील माहेर असलेल्या अंभिरा गोपे यांचे पुण्यातील रहाटणी येथील सासर आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून ७० लाख रुपये आणावे, अशी मागणी करीत सासरच्यांकडून विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केला जात होता. तसेच मारहाण व शिवीगाळ केली जात होती. अखेर सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्या माहेरी परतल्या. शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठत त्यांनी सासरच्यांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

===========

नवीन घरासाठी माहेरून पैसे आणावे म्हणून छळ

जळगाव : नवीन घरासाठी सबसिडी लागणार आहे, त्यामुळे ते पैसे माहेरून आणावे यासाठी ममुराबाद येथील माहेर असलेल्या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक छळ केला. याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा सुरेश शिरसाठ यांचे ममुराबाद येथील माहेर आहे, तर सुरत येथील सासर आहे. दरम्यान, नवीन घरासाठी सबसिडी लागणार आहे. यामुळे माहेरून पैसे आणावे असा विवाहितेकडे पती सुरेश शिरसाठ, सासरे इगन शिरसाठ तसेच सासू आशाबाई यांनी तगादा लावत मारहाण केली. तसेच वेळोवेळी शारीरिक, मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून पूजा या माहेरी परतल्या. शनिवारी तालुका पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.