शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हर...हर...महादेवचा गजर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 20:40 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरूनच घ्यावे लागले दर्शन : मंदिरांवर आकर्षक रोषणाई

जळगाव : ओम नम: शिवाय, हर हर महादेव, बम बम भोलेच्या गजरात गुरुवारी शहरातील शिवालयांमध्ये महाशिवरात्री मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. ओंकारेश्वर मंदिरासह उपनगरांमधील मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बेलपत्र घेऊन शिवभक्त सायंकाळी उशिरापर्यंत मंदिरांमध्ये दर्शनासाठी आलेल्याचे पहायला मिळाले.शहरातील ओंकारेश्‍वर मंदिरात सोमवारी सकाळपासून भाविक दर्शनासाठी आले होते़ मंदिरात पहाटे चारपासून मंदिर दर्शनार्थ उघडण्यात आले होते. पहाटे ५ ते ७ वाजेपर्यंत संजय जोशी, शरद जोशी, जितेंद्र जोशी यांच्याहस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सात वाजता आरती झाली़ सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत अनिल जोशी यांच्याहस्ते अभिषेक झाला. दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पुन्हा अभिषेकाचा कार्यक्रम होऊन सायंकाळी ६ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांच्याहस्ते महादेवाची आरती करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती़ दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातर्फे एलईडी स्क्रीन व ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे यंदा प्रवेशद्वाराच्या बाहेरूनच भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला. दरम्यान, सत्संग भजन मंडळीच्या भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाले होते. मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसादाचे वाटप सुरू होते. त्याचबरोबर हर हर महादेवचा गजरही केला जात होता. श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थान येथेही महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली होती. याशिवाय, भाविकांनी भोलेनाथाला बेलाचे पान अर्पण करून दर्शन घेतले.प्रसादाचे वाटपउपनगर पिंप्राळा येथील विठ्ठल परिसरातील शिव मंदिरातही महाशिवरात्रीनिमित्त प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी सकाळपासून परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळत याठिकाणी भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात होता.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव