शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सखी-सखीतलं हितगूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 17:40 IST

नंदुरबार येथील मराठी साहित्याच्या अभ्यासक प्रा.सविता पटेल यांनी अक्षय तृतीयेनिमित्त सखी-सखीतले हितगूूज मांडण्याचा केलेला प्रयत्न...

अक्षय तृतीयेसंदर्भात अनेक लोककथा, लोकसमज, आख्यायिका आपणास लोकसाहित्यातून तसेच धार्मिक ग्रंथातून वाचावयास मिळतात. कुणबी लोक या सणास ‘आखाजी’ म्हणतात तर गुजर लोक या सणास ‘आखात्री’ या नावाने संबोधतात.अक्षय तृतीयेच्या दिवशी नांगराच्या फाळाला किंवा वखराच्या पासला सोन्याची अंगठी घासून सकाळी औताला बैल जोडून अंगणात उभे करतात. घरधनीण त्यांची पूजा करते. गूळ व धन्याचा प्रसाद देऊन औत शेतात किमान पाच फेऱ्या लावण्यासाठी नेतात. शेतीकामाला मंगल प्रार्थना करून आराधना करण्यात शेतकरी समाज धन्यता मानतो. फळांचा राजा आंबा असल्याने आमरस पुरणाची पोळी जेवणाचे महत्त्व या दिवशी आहे. गुजर समाजात यासाठी ‘सवाष्ण’ (गोळन्यो) जेवू घालण्याचीदेखील पद्धत आहे. बºयाच समाजात कलश व डांगर पूजनाचे महत्त्वदेखील अबाधित आहे. चार मातीचे ठोकळे ठेवून त्यावर माठाची स्थापना करून डेरगं भरण्याची प्रथा आहे. जमलेले सर्व घरातील मंडळी बोटाचा स्पर्श करतात आणि माठाच्या हालचाली पाहून या वर्षी किती पाऊस येईल याचा अंदाज लावतात. गुजर समाजात ५० वर्षांपूर्वी अक्षय तृतीयेला कोणीही पाहुणा कोणत्याही नातेवाइकाकडे मुक्कामी जायचा नाही, अशी पद्धत होती. आज मात्र तसे मानले जात नाही. एक-दोन तासात महत्त्वाचे काम असल्यास पाहुणा म्हणून जाऊ शकतात. याचे दुसरे कारण असे की ‘गजरानू’ परिसरातील गावे ही तासाभराच्या अंतरावर आहेत. त्यामुळे आपले काम आटोपल्यावर सायंकाळपर्यंत आपल्या घरी परत येऊ शकतात. पूर्वी वाहनांची कमतरता असल्याने ही पद्धत रूढ होती व म्हणून सणासुदीला कोणाकडे जात नसत. आखाजीला सखी-सखीतलं हितगुज मांडायचे. हमखास खात्रीचे (खातरी) श्रद्धास्थान म्हणजे कडुनिंबाला हेलकावणाºया आखाजीच्या झोक्यासोबत स्त्री मन मोकळे होते हे एका गुजरी लोकगीतातून स्पष्ट होते.मारा पियरणो वाडो वाडानो लिंबडो लिंबडानो हिचको सखीनो गराडो पछि सु गावानो संसारणो पवाडो आखात्री आखात्री आय आखात्रीणी वात।गयी आखात्री कणतीन हू देखी रहती वाट।याप्रमाणे स्त्री मन हलके होते तर भारत हा कृषिप्रधान देश आहे. नव्याने शेती करायचे तो हाच सुदिन मानून पूज्य मानला जातो. या सणाचे जसे सामाजिक महत्त्व आहे तसेच धार्मिक महत्त्वही तेवढेच आहे.-प्रा.सविता पटेल, नंदुरबार

टॅग्स :literatureसाहित्यnandurbar-pcनंदुरबार